पिंपळगाव ग्रामपंचायत च्या वतीने गटविकास अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांना निवेदन

पिंपळगाव ग्रामपंचायत च्या वतीने गटविकास अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले गेल्या 15/3/2023 सर्व शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पिंपळगाव शिक्षण समिती व ग्रामपंचायत पिंपळगाव संयुक्त संयुक्तपण आम्ही पालक वर्ग निवेदनामार्फत गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे आमच्या इथे सुशिक्षित बेरोजगार म्हणून प्रियंका प्रफुल उजवणे शिक्षण पात्रता बीएससी बीएड , करिष्मा ज्ञानेश्वर बेहेरे शिक्षण पात्रता एम ए बीएड .श्री शुभम विलासराव धोटे शिक्षण पात्रता बीएससी बीएड हे युवक व महीला शिकवण्यास तयार आहे. असे निवेदन देण्यात आलेले आहे निवेदन देताना माननीय सरपंच सौ मनीषाताई अंकुश राव वानखेडे तसेच उपसरपंच श्री अभय मनोरराव मासुरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री नरेश गंगारामजी आत्राम व ग्रामपंचायत सदस्य सौ जनाबाई सुरेशराव तडस समाजसेवक विनोद भाऊ बेहरे तसेच निलेश भाऊ गुजरकर , मोहन बेहरे शुभम मासुरकर शुभम धोटे प्रफुल बेहरे चिंतामणी भाऊ टेकाम दिलीप कोटेकार पांडुरंग जी बेहरे. ही सर्व मंडळी गावकरी मंडळी निवेदन देताना हजर होते.

बाॅक्स

निलेश गुजरकर यांचे सोबत संपर्क साधल्या असता त्यांनी जे पिंपळगाव ग्रामपंचायत च्या वतीने हे जे मोहीम चालू केली आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव पातळीवर सगळ्यांनी चालू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी आमच्या इथली सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी जो जो उपक्रम हाती घेतलाय तो चांगला असून जे कर्मचारी संपावर गेले आहे कोणताही विद्यार्थ्यांचा किंवा शेतकऱ्याचा विचार न करता पेन्शन साठी आपली मनमानी करीत असताना शासनाने सुद्धा सुशिक्षित बेरोजगारांना संधी देऊ काम करण्यासाठी प्रेरित करावे हीच महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे.