राळेगाव तालुक्यातील चहांद येथील प्राची पाटील पीएचडी ने सन्मानित

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव पाटिल यांची मुलगी व वनोजा येथील सुरेशराव उगेमुगे यांची सुन ईला महिला उद्योजकांचे सांयकोडायानामिक्स:इश्यूज अॅड कन्सन या विषयावर पीएचडी प्रधान करण्यात आली आहे . त्यामुळे राळेगाव तालुक्याची शान वाढली आहे. प्राची पाटील यांना व्हीएनआयटी नागपूरमध्ये डॉ. योगेश देशपांडे यांच्या देखरेखीखाली महिला उद्योजकांचे सायकोडायनामिक्स: इश्यूज अँड कन्सर्न या विषयावर पीएचडी प्रदान करण्यात आली.
१५ सप्टेंबर २०२२ रोजी व्हीएनआयटीच्या २०व्या दीक्षांत समारंभात तिला अभियंता दिनी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
तिने नामांकित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय जर्नल्समध्ये 12 शोधनिबंध प्रकाशित केले आहेत आणि स्कोपसमध्ये अनुक्रमित IGI GLOBAL मधील 2 पुस्तक प्रकरणे आहेत.
ती चहांद (ता. राळेगाव )येथील . अशोकराव पाटील यांची कन्या आणि . सुरेशराव उगेमुगे वानोजा (ता. राळेगाव )यांची सून आहे.ती आनंदनिकेतन, वरोरा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. नीलेश उगेमुगे यांच्या पत्नी आहेत.
पीएचडीच्या प्रवासात साथ दिल्याचे श्रेय तिने संपूर्ण कुटुंबाला दिले.
आता ती अलीकडेच DAIMSR NAGPUR मध्ये रुजू झाली आहे आणि BBA विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे.प्राची ईला अनेकांनी अभिनंदन करण्यात आले आहे.