तालुक्यातील कुंभा येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना सोमवारला दुपारच्या सुमारात घडल्याने एकच खळबळ उडाली.
दिवसेंदिवस अत्याचार घटनेत वाढ होत असताना तालुक्यातील कुंभा येथील शौचास गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असुन ,मारेगाव पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद झाली असुन ,मोबाईल लोकेशन आधारे संशयित आरोपीला राळेगाव येथुन अटक झाल्याची माहीती मारेगाव पोलीसांनी दिली आहे,संशयित आरोपी शहबाज शेख शब्बीर वय २७ माता नगर राळेगाव व एका अल्पवयीन बालकाला अटक केली असुन आरोपीवर ३७६, ३७६ (२) (जे ) भादंवी ४,६,८ बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा नोंद केला असून घटनेचा तपास पोलीस घेत आहे.
