अ. भा. ग्राहक पंचायत राळेगाव –
डॉ .वर्मा सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नारायणराव मेहरे व जिल्ह्यातील ईतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात डॉ. के. एस. वर्मा यांची अ. भा. ग्राहक पंचायत राळेगाव तालुका शाखेचे अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा सर्वानुमते निवड करण्यात आली. शोभाताई इंगोले उपाध्यक्ष, डॉ अश्विनी थोडगे उपाध्यक्ष, प्रा मोहन देशमुख सचिव, भूपेंद्र कारीया कोषाध्यक्ष, विनय मुणोत संघटक, राजेश काळे प्रसिद्धीप्रमुख, सदस्य- प्रतीक बोबडे, गजानन काळे, गोपाळ बुरले, पुरुषोत्तम मेंडुलकर, माधुरीताई डाखोरे, भावनाताई खनगन, छायाताई पिंपरे नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांना प्राध्यापक मेहरे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी कोषाध्यक्ष अनंतराव भिसे, प्रसिद्धी प्रमुख डा. शेखर बंड, यवतमाळ शहराध्यक्ष आड. राजेश पोहरे हजर होते. ग्राहकांनी आपल्या विविध प्रकारच्या तक्रारी ग्राहक पंचायत कार्यालयात दाखल कराव्यात,त्यावर निशुल्क मार्गदर्शन केल्या जाईल असे आवाहन ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आले.