
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या विविध पथकांनी तसेच नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक व इतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या निवडणूक विषयक कामाच्या अनुषंगाने विविध कर्तव्ये व जबाबदाऱ्या कालमर्यादेत पार पाडाव्या अशा 88सूचना प्रशिक्षणामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या आहे.
आदर्श आचार संहिता व माध्यम तक्रारी याबाबत तहसीलदार अमित भोईटे यांनी, प्रसारमाध्यम व सनियंत्रण याबाबत कळंब येथील तहसीलदार धीरज स्थूल यांनी, निवडणूक संदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीचे निवारण तसेच निवडणूक कालावधीत व निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण तसेच विविध संगणकीय प्रणाली बाबत नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना कार्यप्रणाली अभियंता रोहित भोरे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी राळेगाव विधानसभा मतदार संघ निहाय नियुक्त क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रीय पोलीस अधिकारी, विविध पथके, नोडल अधिकारी, तसेच नोडल अधिकारी यांचे सहाय्यक व नियुक्त कर्मचारी यांना घेण्यात आलेल्या सभेत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
