स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती


लोकहीत महाराष्ट्रउमरखेड
तालुकाप्रतिनिधी
संदीप बी. जाधव

आज दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि आण्णाभाऊ साठे ह्यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला .ह्यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून ढाणकी नगरपंचायतचे नगरसेवक श्री संबोधी गायकवाड उपस्थित होते व संदीप जाधव प्रतिनिधी लोकहित महाराष्ट्र महाराष्ट्र उमरखेड तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.एच जयस्वाल सर आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते .
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विजय पराते सरांनी केले तदनंतर मुलांची भाषण , गीत सादर केली . त्याच बरोबर शिक्षकांनी लोकमान्य टिळक आणि आण्णा भाऊ साठे ह्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आणि मुलांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडवगडे सरांनी केले तर आभार काईट सरांनी केले.