
एस.एस. शुक्ला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई यांचे उमरेड टोल नाक्यावर दुर्लक्ष
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावालगत असलेल्या उमरेड येथील एन.एच.३६१बी. या टोल नाक्यावर सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने होतोय प्रवाशांची व वाहन चालकांची गैरसोय सविस्तर वृत्त असे वडकी ते राळेगाव रोडवर उमरेड टोल नाक्यावर कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसल्याची चर्चा सध्या वाहन चालकांमध्ये होत आहे. सदर टोल नाका उभारतांना सर्व सोयी सुविधा असणे गरजेचे असते परंतु या टोलनाक्यावर ना ॲम्बुलन्सची व्यवस्था,ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ना प्रवाशासाठी टॉयलेटची व्यवस्था तर या टोल नाक्यावर मोठमोठे लाईट असून सुद्धा येथील लाईट फक्त शोभेची वस्तू बनली आहे. कारण या नाक्यावर काही लाईट बंद तर काही लाईट चालू दिसून येत आहे. तर टू व्हीलर गाडीसाठी जाणाऱ्या मार्ग सुद्धा अपघाताचे आमंत्रण देत आहे. कारण दुचाकी जाणाऱ्या मार्गावर एक साईट संपूर्ण खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. सदर या टोल नाक्यावर रात्र दिवस ९ ते१० कर्मचारी काम करत असल्याची माहिती आहे. परंतु येतील कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सेक्युरिटी नसल्याचे सांगण्यात येत आहे. येथील कर्मचाऱ्यांना हेल्थ इन्शुरन्स सारख्या सुविधा सुद्धा देण्यात आल्या नसल्याचे समजले आहे. सदर येथील काम करत असताना एखाद्या कर्मचाऱ्यांना कमी अधिक झाल्यास याला जबाबदार कोण? सदर येथील कर्मचाऱ्यांना हेल्थ इन्शुरन्स सारख्या सुविधा व पीएफ फंड सारख्या सुविधा देणे गरजेचे आहे. या बाबीकडे संबंधित अधिकाऱ्याने लक्ष देऊन येथील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे वाहन चालक व प्रवाशांमध्ये बोलल्या जात आहे
