ढाणकी शहरात विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा

प्रतिनिधी प्रवीण जोशी
ढाणकी


ढाणकी शहरातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव अत्यंत भक्ती भावाने व हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला शिवरात्र सुरू झाल्यानंतर अगदी रात्री प्रहरी बाराचे नंतर गावातील महादेवांच्या मंदिरात शंखनाद सुरू होऊन मंदिरात भक्तांची मांदियाळी व गर्दी बघायला मिळाली शिवाय महाशिवरात्र निमित्ताने शिवलीला या ग्रंथाच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले होते विविध फुलांनी महादेवाच्या पिंडीचे पूजन करण्यात आले तसेच संपूर्ण पिंडीला पांढऱ्याशुभ्र विभूती लावल्यामुळे भोले बाबा महाकाल यांची मूर्ती खूपच अमोघ वाटत होती रांगोळ्याच्या आराशीमुळे परिसर सुप्रसन्न झाला होता.

संपूर्ण जगाला अमृताचा भोग अर्पण करून स्वतः विष प्राशन करणारे देवाधी देव महादेव अशी शिवशंकराची महती असून चांगले ते जगाला दिले मात्र विष स्वतः हा प्राशन करून जगावर सदा निरंकार कृपादृष्टी दाखवली यावरून श्री शंकराचे महात्म्य कळते स्थानिक बसवलिंग महादेव मंदिरात यावेळी विविध धार्मिक ग्रंथाचे पठण करण्यात आले शहरातील अनेक मंदिरांमध्ये भगवान शंकराच्या पिंडीवर बेल जो महादेवांना अत्यंत प्रिय मानल्या जात असल्या कारणाने अर्पण करण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली पुराणीक कथांमध्ये भगवान शंकराने विष प्राशन केल्याचे सांगितले जाते व चंदन हे थंड असल्याकारणाने भगवान शंकराच्या पिंडीला चंदनाचा लेप सुद्धा लावण्यात आला होता. तसेच अनेक भक्तांना दिवाळी आणि दसरा सन उत्सव असल्याची जाण होत होती तसेच गावात ठिकठिकाणी महाप्रसादाच्या कार्यक्रम आयोजित केला होता याचा लाभ भक्तांनी घेतला व हर हर महादेव चा जयघोष संपूर्ण शहरात निनादत होता तसेच या पावन महाशिवरात्रीला अनेक भक्तांनी दुधाचा अभिषेक करून बेलपत्र अर्पण केले व अनेक भक्तांचा सोहळा यावेळी जमला होता विशेष करून भगवान शंकराच्या प्रतिमेमध्ये माता पार्वती सुद्धा आढळते त्यामुळे शंभू महादेवाला अर्धनारी नटेश्वर असे सुद्धा संबोधल्या जाते यावरून स्त्रीशक्ती ही सुद्धा बलाढ्य आहे असे त्यावेळी शंभू महादेवानी संपूर्ण विश्वाला बहुदा सांगितले असावे.