ऑनलाइन नोंदणी करून, आता थेट घरपोच वाळू पुरवठा करणार, राज्य सरकारने केले नवीन धोरणपण हिंगणी ब्रिज जवळून नदी पात्रातून रविवारच्या दिवशी वाळू तस्करी होतोय जोरात

उमरखेड तालुका प्रतिनिधी:विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण)


महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री श्री राधाकृष्ण ए. विखे पाटील यांनी वाळू वाहतुकीबाबत एक नवीन धोरण आखले आहे तस्करी वाळू विक्रीचा मुद्धा राज्यभरात चांगला चर्चेत आहे दरम्यान राज्य सरकारने राज्यस्तरीय महसूल परिषदेत वाळू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला व नवीन धोरणा अंतर्गत घरपोच वाळू विक्री केली जाणार असल्याचे त्यांनी प्रत्रकार परिषदेत सांगितले ज्यांना बांधकामासाठी वाळूची गरज असेल त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घरपोच वाळू पुरवठा व चालू वाळू विक्रीवरील वाद मिटवण्यासाठी हा धोरण आखन्यात आला आहे वाळू व्यवसाय तील साईड बिजनेस चा भयानक चित्र बदलण्यासाठी हे धोरण महत्वपूर्ण ठरणार आहे मोठया प्रमाणात उलाढाल करणारा व्यवसाय आहे अनेक ठिकाणी हा व्यवसाय अनधिकृत केला जातो म्हणून भाष्टाचार वाढत आहे त्यामद्ये कित्येक नेते व कित्येक उद्योगपती शामिल आहेत या व्यवसायला शिस्त लावण्यासाठी आजपर्यंत खूप प्रयत्न झाले यासाठी विविध नियम व अटी बनवण्यास आली आहे त्यामुळे भ्रष्टाचार, चोरीला आळा घालण्यासाठी माननीय महसुलमंत्री यांनी पुढाकार घेतला आहे पण वाळू तस्करीवर महसूल विभाग यांचा नियंत्रण बरोबर नाही आहे.रविवारचा दिवस पाहून हिंगणी येतील ब्रिज जवळील नदी पात्रातून जोरात वाळू तस्करी चालत आहे असे नागरिकांकडून एकावयास मिळत आहे व तसेच नदी पात्राच्या शेजारी असलेल्या नागरिकांकडून सुद्धा ऐकाव्यास मिळत आहे तरी महसूलमंत्री श्री राधाकृष्ण ए. विखे पाटील यांनी महसूल विभागाला तात्काळ निवेदन देऊन वाळू तस्करी करीत असलेल्या यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि जे आनलाईन नोंदणी करून घरपोच वाळू पुरवठा ही योजना राज्य सरकारने केले आहे ते लवकरात लवकर ही योजना चालू करावी असे नागरिकांकडून एकाव्यास मिळत आहे.