
महाराष्ट्रातील आणि विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ञिवेणी संस्कार सार्वजनिक वाचनालय, कोंढाळा द्वारा “स्व. रामाजी लोंढे स्मृती किसानरत्न पुरस्कार” शेतीक्षेञात नवोपक्रम, संशोधन करणाऱ्या व शेतीक्षेञाच्या विकासासाठी विशेष योगदान देणाऱ्या शेतकऱ्यालाच दिला जात असतो.
हगामी वर्षे २०२२-२३ चा पुरस्कार आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलेला असून तो
प्रदान करण्याच्या दृष्टीने या वर्षी केवळ यवतमाळ जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांकडून त्यांचे प्रस्ताव जाहीरात प्रकाशित झाल्यापासून २१/०३/२०२३ च्या आत मागविण्यात येत आहे.
तरी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या संपूर्ण माहिती सह राबविलेल्या उपक्रमांची सचिञ माहीती असलेले प्रस्ताव श्री राम जी वन अग्रो टूरिझम, कारेगाव, ता. राळेगाव, जिल्हा यवतमाळ ४४५२०८ या पत्त्यावर पाठवावे. प्राप्त प्रस्तावातून पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याची निवड केली जाईल. निवडीचे सर्व अधिकार निवड समितीला राहील. अधिक माहीतीसाठी सचिव अजय येडे ९७६४९८६६४४ अध्यक्ष पञुजी फुलभोगे, विकास लोंढे ९६७३३८६९६३, प्रविण देवतळे ९८५०६९६५०१ नितेश लोंढे यांच्याशी संपर्क साधावा.
दि ६/०३/२०२३
सौ. सीमाताई लोंढे
