प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी
महाराष्ट्र शासन वन विभाग द्वारा पांढरकवडा वन्यजीव विभाग पैनगंगा अभयारण्य वनपरिक्षेत्र बिटरगांव बु.ता.उमरखेड च्या विभागा अंतर्गत अहिल्यादेवी होळकर प्राथ.शाळा,बिटरगांव बु.प.स.उमरखेड येथे वन्य प्राण्यांचे संगोपन हेच पर्यावरणाचे रक्षण ह्या विषयी जन जाग्रुती अभियान मोहीम दिनाक ०१आक्टोंबर २०२२ते ०७आक्टोंबर २०२२दरम्यान राबविण्यात येत आहे.त्यानिमित्याने प्रथम समस्त विद्यार्थी शिक्षक वनविभागातील कर्मचारी यांनी संणुर्ण समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी आणी पर्यावरणाचे महत्व पटवुन देण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संपूर्ण समाजाला वृक्ष लागवडीचे महत्त्व व त्या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.”झाडे लावा झाडे जगवा” “झाडे लावा प्राणी जगवा” “झाडे लावा पर्यावरणाचे रक्षण करा” प्रभात फेरीत अशी जनजागृती करण्यात आली.त्यामध्ये वृक्ष संवर्धन वृक्षारोपण पाण्याचे योग्य नियोजन याबद्दल जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित समस्त मान्यवरांचे स्वागत वृक्ष भेट देऊन करण्यात आले.त्यामध्ये वन विभागातील कर्मचारी देवानंद नारायण सरकाळे(वनपाल) वनपरिक्षेत्र कार्यालय बिटरगाव बु. व त्यांची संपूर्ण चमु भास्कर बालाजी हरणे (वनरक्षक),शेषेराव जेता चव्हाण (वनमजूर),राजू रूपला राठोड (वाहन चालक),पुंजाराम लक्ष्मण कोंडेवाड (मजूर) तसेच शाळेतील संपूर्ण कर्मचारी त्यामध्ये शाळेचे मुकुंद येल्हेकर(मुख्याध्यापक), राजकुमार खंदारे(शिक्षक),श्रीमती सीमाताई गारसेटवाढ(शिक्षिका), अमोल कवाने(अधीक्षक) गजानन रामशेटवाड,सदानंद दुलेवाड,बंडू कोंडबा दोडके (सेवक)व उपस्थित समस्त पालकवर्ग कार्यक्रमाची सांगता विद्यार्थांना खाऊ वाटप करून करण्यात आली.