

उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
शासकीय,निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहायक, आरोग्य सेवक, पाठबंधारे विभाग कर्मचारी संघटना यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी दि.14/03/2023 पासून बेमुदत संप पुकारला आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिह्यांमध्ये व तालुक्यात सर्व संघटनेच्या वतीने हा संप सुरूच आहे.
संपास राजपत्रित अधिकारी,सर्व विभागातील कर्मचारी यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय हा संप बंद होणारच नाही यावर सर्व संघटना ठाम आहेत.खरोखर पाहता 2004 नंतरच्या कर्मचाऱ्यावर हा एक प्रकारचा अन्यायच केला जात आहे.हा लढा स्वतः पुरता मर्यादित नसून भविष्यात शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या सेवेत लागणाऱ्या मुलाबाळा करिता आहे.
