
तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांना शेतामध्ये जायला रस्ताच नाही, व पावसाळ्यात रस्त्याची व पुलाची झालेली दुर्दशा शेतकरी पुर्णपणे हतबल झाला. हिंगणघाट तालुक्यातील खापरी गांगापुर येथील पांदण रस्ता हा दोन किलोमीटरचा असून बांमर्डा येथील गांगापुर हाय क्रमांक सात ला शिव जोडला गेला, गांगापुर खापरी येथील शेतकऱ्यांना व शेत मजुरांना शेता मध्ये जाण्यासाठी हा रस्ता चिखलाने माखलेला दिसून येत आहे , मागील 20 वर्षांपासून शेतकऱ्यांना व शेतमजुरांना व शेतकर्याच्या सर्जा राजाला नाहक त्रास भोगावा लागतो ,शेतामधून घरी आणण्यासाठी कापूस, तूर सोयाबीन , गहू ,हरभरा ,व सल्फेट ,खत इत्यादी बैलबंडीने , ट्रॅक्टर, ने आण करण्यास अडचण येत आहे.पावसाळ्यात गाळामध्ये कित्येक दिवस बैलबंडी फसून राहते गांगापुर गावाजवळ जवळ तलाव लागून असल्याने पूर्ण पाणी नाल्यातून वाहते तिथे उडान पूल नसल्याने शेतकऱ्यांना बंडी पावसाळ्यात कशी न्यायची असा प्रश्न निर्माण झाला,आहे , पावसाळ्यात जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यात शेतकऱ्यांची बैल बंडी पलटी सुद्धा झाली ,गंभीर दुखापत बैलांना झाली ,गावालाच लागून असलेले तीर्थक्षेत्र मंदिर गावाच्या मधोमध गाव खापरी गांगापुर बांमर्डा या गावच्या मध्ये एक नागोबाचे मंदिर आहे त्या ठिकाणी भाविक गावोगावचे स्वयंपाक घेऊन त्या ठिकाणी सहभोजन करत असतात उन्हाळ्यात या ठिकणी खापरी , बांमर्डा गांगापुर येथील तीन गावची वर्दळ असतात , व या ठिकाणी असा चार चार फुटाचे खोल खड्डे पडलेलं मोठया मोठया भेगा पडून रस्ताची दुर्दशा झाली असल्यामुळे वर्षानू वर्ष हा रोड चिखलाने माखलेला असतो , रस्ताच्या बाजूला नाली नसल्यामुळे शेतातील सार्वजनिक पाणी ,त्या रस्त्यावर खोल तीन फुटाच्या खोल खड्या मध्ये पाणी साचून राहते ,व खड्डे मोठे मोठे पडून शेतकऱ्यांच्या बैलाचे नुकसान सुद्धा झाले आहेत, त्यामुळे,रस्ताची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ,प्रतिनिधी व परिसरातिल लोक प्रतिनिधी नागरिक करीत आहेत, खापरी गांगापुर, बांमर्डा ,गावा मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा कोणताही लाभ सुद्धा मिळाला नाही त्या मुळे प्रशासनाने लक्ष देऊन रस्ताचे काम पूर्ण करावे , अशी मागणी शेतकरी अंबादास हाते यांची प्रतिक्रिया एकदा माझी बैल बंडी पलटी होऊन माझा जीव वाचला तरी त्या ठिकाणी कोणी येऊन सुद्धा जागेची पाहणी केली नाही, काय रस्ताची दुर्दरशा आहे तर , रोड न झाल्यास उपोषण करू शेतकरी गजानन हाते ,गजानन सातोंने ,रंजित हाते ,रवी कवडे , बुद्ध भूषण जारोंडे ,साटोने ,भैय्याजी मुन , नारायण पोहनकर ,किशोर राऊत, नागरिक प्रतिनिधी करत आहे .
