
तत्कालीन स्वातंत्र पूर्वीचे समाज सुधारक हे निस्वार्थी होते लोभी व सुंठ फुकून दुफट निघाल्यानंतर पळून जाणारे नव्हते ह्या बाबी त्यांच्याकडे अस्तित्वात नव्हत्या म्हणूनच आज त्यांना जनमान्यता आहे पण आजकालचे समाजसेवक हायटेक बनले स्वार्थी लोभी आणि धूर्त राजकारणाची खेळी त्यांच्या क्रीडेमधून दिसून येते स्वतःच्या तूमडया भरणाऱ्या सेवा समाजसेवकाची कुरापतखोर, उत्पत्तीकार, प्रवृत्तीकार, विचित्रकार, यांची फौज सक्रीतेमुळे त्यांची सेवा कमी पण अर्थसेवा जास्त दिसत आहे धुव्रिकरण करून दोन ठिकाणी तेढ निर्माण करून आपला हेतू साध्य करणारी विषारीपणा असलेली “नागाची”व खूपनाऱ्या “मुतखड्याची” संख्या कमी नाही. संघटनेत काम करून त्या संघटनेचा कोणत्या पक्षाची संबंध आहे हे लक्षात घेऊन तेथील पदावर सुद्धा समाजसेवकाचा डोळा तर असतोच शिवाय बारीक नजर असतेच असते पण ज्या ठिकाणी तेढ निर्माण केली असेल यांचे आर्थिक व्यवहार व सौदेबाजी मात्र तुफान होताना बघायला मिळत आहे पण यात भरडल्या जातो तो सर्वसामान्य युवकच. तसेच संघटनेतून पक्षात आपल्याला मानेल व विरोध न करणाऱ्यांची वर्णी पक्षात लावून आपला खुंटा मजबूत करून पक्षश्रेष्ठीवर सुद्धा वर्चस्व निर्माण करून संघटनेत व संघटना प्रणित पक्षात समाजसेवकाचे सिलेक्शन आणि कलेक्शन या दोन्ही बाबींचा सुयोग्य मानबिंदू असलेला हेतू दबदबा साधल्या जाताना बघायला मिळत आहे. समाजसेवक म्हणून वावरत असताना वैचारिक मतभेद असल्यास अर्थव्यवहार सुद्धा करू नये पण हा मतभेद केवळ दिखाऊ स्वरूपाचा असून ज्यावेळी कलेक्शनचे वेळ येते त्यावेळेस सर्व काही हेवेदावे आणि धर्मकांड रुपी हळकुंड बासनात गुंडाळून ठेवले जाते ही कोणती दीखाऊ समाजसेवा व कार्यकर्ता हा सुद्धा प्रश्नच पडतो.
म्हणूनच एका सुभाषितकारांनी मांडलेल्या कवितेची जाण होते
माणसा माणसा
तुझी नियत बेकार
तुझ्या हून बर गोठ्यातल जनावर
….
बाबू गेनू प्रीतीला वद्देदार लाला लजपतराय यांनी आंदोलने केली अन्यायाविरोधात पण त्यांची कोणत्याही प्रकारची महत्त्वकांक्षा नव्हती इंग्रज पोलिसांच्या लाठी मारात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला पण आंदोलनातून काढता पाय घेतला नाही आंदोलन त्यांनी ऊभारली आणि ते स्वतः होणाऱ्या पुढील बाबीला बळी पडले म्हणूनच त्यांचे नाव अजरामर आहे आता यात परिवर्तन झाले असून निवडणूक आली म्हणजे स्वतःचे उखळ कसे पांढरे होईल एवढेच बघल्या जाते तरुणाचा मेळा जमवून संघटना व संघटनेमार्फत चालणाऱ्या पक्षावर माझा किती दबदबा असून स्वतः किती आणि कशी फलप्राप्ती होईल एवढेच बघितल्या जाते व संस्कार शिस्त अशा फुशारक्या मिरवणाऱ्या सर्व बाबी बासनात गुंडाळून ठेवतात जिथे संस्कार आणि शिस्त टिकली नाही त्यांची नीतिमत्ता काय टिकणार व जो नितीमत्ता विसरून जर समाजात वावरला त्याचा जनतेने कधीच स्वीकार केला नाही तात्पुरता कितीही उदो उदो होत असेल पण हे जास्त काही काळ चालणार नसते वेशीबाहेरील दरवेशी समाजसेवकाचा वावर सुद्धा असतोच असतो अर्थ सेवकाची सुपारी घेऊन गोड बोलून व समाजात वावरून सुंठ फुकून वावरणाऱ्या समाजातील तो एक नर्तक होय, जय आणि विजयाचे नारे देऊन व ज्या ठिकाणी तंटा निर्माण झाल्यास किंवा निर्माण करून तो त्यावेळी तेथील प्रसंगाचा नायक बनवून आपली तुमडी कशी भरल्या जाईल अशा सडक्या वृत्तीची नीतिमत्ता असलेले कुरापतकारा पासून तरुणांनी वेळेस सावध राहायला हवे तरुणांनी जास्तीत जास्त अर्थ प्राप्ती पैसे कोणत्या कष्टप्राय कामामधून मिळेल यामागे लागल पाहिजे कोणत्याही कामाची लाज बाळगू नये शेती असेल तर त्यात नवनवे प्रयोग करून आपली उन्नती करावी तरुण हे देशाची संपत्ती आहे भ्रमित करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या सडक्या वृत्तीच्या समाजसेवकापासून दूर राहून प्रगती केल्यास उत्तम होईल विशेष म्हणजे आंदोलने ज्यांनी पेटवली त्यांच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद नाही किंवा कायद्याच्या कचाट्यात अटकला नाही उलट इतरांना अटकवून त्यांच्या जीवावरच इतके दिवस सगळे काही यथोचित चालले पण तरुणांनो उठा जागे व्हा आणि बारकाईने विचार करा आणि षड यंत्रि पातळयंत्री मायावी व्यक्तीपासून दूर राहा
मतलबासाठी
मान माणूस ढोलये
ईमानाच्या साठी
कुत्रा शेपूट हालये
प्रवीण जोशी
ढाणकी, ता उमरखेड
