
महात्मा बसवेश्वर हे अगदी लहान असताना कर्मठ विधींना विरोध करत असत. वयाच्या ८ व्या वर्षी मुंजीची तयारी होत असताना मला आधीच लिंगदीक्षा मिळाली असे सांगून मुंज करून घ्यायचे नाकारले. आणि सर्व काही सोडून कुंडलसंगम येथील पुढील तपविधी करण्यासाठी प्रस्थान केले कृष्णा व मलप्रभा या नद्याच्या संगम तिरावर कुंडल संगम येथे अध्ययंन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी १२ वर्ष वास्तव्य केले तसेच त्यांनी त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसारासाठी अनेक भाषांचा धर्माचा इत्यादी बाबींचा अभ्यास केला. तसेच सोलापुरातील मंगळवेढा येथे बरेच दिवस राहिले आणि खऱ्या अर्थाने तेथूनच लिंगायत धर्माची स्थापना केली असे सांगितले जाते व त्यांना ओम नमः शिवाय हा मंत्र अत्यंत प्रिय होता तसेच १२व्या शतकामध्ये भारतीय समाज खास करून दक्षिण भागातील समाज हा अनेक अंधश्रद्धा, कर्मकांड, आणि विषमता, भेदभाव, अशा बाबींनी त्रस्त झाला होता अशा वेळी त्या काळात समाजात सुधारणा करण्याचे धाडस प्रभू बस्वेश्वराणी केले मान अपमान अनंत त्रास भोगून तत्कालीन प्रस्तापिता विरुद्ध खूप मोठा संघर्ष आणि बंड उभा केला यामुळे त्यांना १२ व्या शतकातील धार्मिक सांस्कृतिक सर्व क्षेत्रात जीवनातील खूप सुजाण व परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्वज्ञानी समाज सुधारक व कवी आणि लिंगायत धर्माची निर्माते अशी ओळख निर्माण केली
नक्कीच तद्नंतर संत निळोबाराय संत सावता माळी माऊली ज्ञानेश्वर व संत तुकोबाराय यांनी सुधा समाजामध्ये जी काही परंपरा व रूढी अंधश्रधेला अनुसरून समाजाला दिशा आणि मार्ग दाखविन्याचे काम केले ते पण अत्यंत जिकीरीचे काम होते पण महात्मा बसवेश्वराणी या बाबींचा पायंडा या आधीच उभारून मार्ग दाखविण्याचे काम केले त्या अनुशाघाने महात्मा बसवेश्वराणी समाजातील दरिद्रीपणा, विषमता दूर करून आर्थिक सुबता निर्माण करण्यासाठी कामक व कैलास आणि दासोह अशा दोन जबरदस्त संकल्पना दिल्या स्वयंमप्रेरनेणे केलेलं प्रेत्येक काम हिच खरी शिवउपासना हे त्यांच्या कायक व कैलास सिद्धांताचे सारा सार होय शारीरिक श्रम किवा व्यवसाय हाच कैलास होय संकल्पना मांडली महात्मा बसवेश्वर यांच्या काळात समाज अनेक बाजूने पिचून जात होता पण त्यावेळी त्यांनी संघर्ष चालूच ठेवला हे विशेष.
तत्कालीन व्यवस्था स्त्रीला हीन दर्जाची वागणूक दिल्या जात असत मनून त्यांनी स्त्रियांसाठी खूप मोठे भरीव कार्य केले स्त्रियांना आपले स्वत्रंत्र मत मांडण्याचा अधिकार दिला त्यांना धार्मिक विधी करण्याची मुभा प्रदान केली. आणि स्त्रियांची पंचसूतका मधून सुटका केली हे विशेष काळाच्या पुढचा विचार करणारे महात्मा बसवेश्वराणी मांडली यावरून स्त्रीप्रती आदरयुक्त भावना होत्या हे दिसून येते. तसेच अस्पृशता निवारण स्त्री स्वालंमबनासाठी कार्य केले. आलेल्या अनुभवाच्या माध्यमातून त्या काळी लोकशाही निर्माण केली काळाच्या पुढचा विचार करून समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले महात्मा बसवेश्वर यांचे वचन साहित्य आहे ते मराठीत येण्यास नक्कीच वेळ लागला या साहित्यात भारतीय संस्कृतीची नितीमुल्य मांडली आहेत तसेच महात्मा बसवेश्वर यांचे वचन साहित्यात आधुनिक साहित्याचा प्रारंभ होताना दिसतो. अशा परिस्थितीत सुद्धा त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस केले वेळेवेळी अपमान कष्ट व टीका सहन करत त्यांनी प्रस्थापितां विरुद्ध बराच कल संघर्ष करून सर्वसामान्य जीवनाची व्याख्या समजावली अशा थोर महात्मा असलेल्या स्वामी बस्वेश्वराना जयंती निमित्य वंदन
प्रवीण रमेशराव जोशी
मु. पो. ढाणकी. ता उमरखेड जि यवतमाळ.
७३८५२६६१६६
