उमरखेड येथे पुसद रोड उमरखेड जिल्हा परिषदेच्या प्रारंगणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुत्वाची बुलंद तोफ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे यांनी स्थानिक आमदारांचा व सरकारचा चांगलाच समाचार घेतला. त्यात त्यांनी शेतकरी आत्महत्या, ढाणकी उमरखेड रोड , तसेच महिलांची असुरक्षितता यावर भाष्य केले. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून आत्महत्या सत्र रोखण्यासाठी रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. तसेच नवयुवकाच्या हाताला काम नाही नवयुवक हा सुशिक्षित बेरोजगार झालेला आहे. यास जबाबदार कोण? असा प्रश्न प्रचार सभेत त्यांनी मतदारांना उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातील महिला सुद्धा सुरक्षित नाही . ढाणकी उमरखेड रोडची अवस्था पाहिली तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. मग स्थानिक आमदारांनी केले तरी काय? हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक आमदार व सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यासाठी आम्हाला एक वेळेस संधी द्या व एक हाती सत्ता द्या महाराष्ट्राची उज्वल भविष्य घडविण्यासाठी मनसेला एक संधी द्या अशी राजगर्जना त्यांनी उमरखेड महागाव मतदार संघात राजेंद्र वामन नजरधने यांच्या प्रचार सभे दरम्यान मतदाराची संबोधित करताना केले.