शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान त्वरित द्यावे

सहसंपादक :- रामभाऊ भोयर

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये अनुदान द्यायचे शासनाने जाहीर केले पण अजूनही अनेक शेतकऱ्यांना ते न मिळाल्याने ते त्वरित द्यावे अशी मागणी राळेगाव ग्राविकाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला दिलेला निवेदनात करण्यात आली आहे नियमित कर्जदार सभासदांना प्रोत्साहन म्हणून महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना 2019 अंतर्गत पन्नास हजार रुपये अनुदान द्यायचे शासनाने ठरविले आज या घोषनेला तीन वर्ष लोटले आहे राळेगाव ग्राविकाच्या काही कर्जदार सभासदांना या योजनेचा लाभ मिळाला पण अजूनही 124 कर्जदार सभासद या योजनेस पात्र असूनही त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही सद्यस्थितीत शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे दयनीय अवस्था झाली आहे एकीकडे अतिवृष्टी झाली तर दुसरीकडे आता पाउसच गायब झालाआहे अशा परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे यावेळी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे ही गरज लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान द्यावे अशा मागणीचे निवेदन राळेगाव ग्राविकाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहेत निवेदन देताना राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी कृष्णराव राऊळकर विनोद नरड गजानन पाल शेतकरी निलेश फाळके बंडू लोहकरे शाम राडे उपस्थित होते.