
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
पवनी तालुक्यातील पाथरी पुनर्वसन येथे माया पिरॅमिड ध्यान केंद्राचे उद्घाटन आज दिनांक 10 मे 2026 ला सकाळी 11 वाजता करण्यात आले. सदर पिरॅमिड ध्यान केंद्राचे उद्घाटन डॉ. चारमोडे गंगोत्री पिरॅमिड सेंटर लाखनी, हिरा बांगडे राजनांदगाव, माया पिरॅमिड केंद्राचे संचालक सोमेश्वर गोस्वामी,सौ. ललिता लांजेवार ,जया कपाले, वैशाली डरवाल ,खोब्रागडे मॅडम, रश्मी पांडे,राजश्री कुसरे,गजानन गाऊत्रे ,नारायण खापेकर ,ऍडव्होकेट संतोष लांजेवार, खोब्रागडे मॅडम,नागपूर,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सदर ध्यान केल्यामुळे तन स्वस्थता होते, मनाची शांती ,बुद्धीचा विकास, आत्म्याला आनंद मिळतो. सदर ध्यान केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागात प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने या ध्यान साधना केंद्राची सुरुवात करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट संतोष लांजेवार यांनी केले तर आभार गजानन गोत्रे नागपूर यांनी मानले.यावेळी बऱ्याच संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते व सहभोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती.
