धडक सिंचन विहीर योजना सुरू करा हो माय बाप सरकार

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

चार वर्षापासून धडक सिंचन विहीर योजना ही बंद आहे त्यामुळे राळेगाव शहरासह तालुक्यातील लोकांना विहिर मिळन्यास अडचण येत आहे धडक सिंचन विहीर योजना सुरू झाल्यास तालुक्यातील विहिरीचा अनुशेष कमी होऊ शकतो त्यामुळे धडक सिंचन विहीर योजना सुरू करा हो असे म्हणण्याची वेळ शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यावर आली आहे .तालुक्यात एमआरइ जीएसच्या माध्यमातून विहिरी देणे व बांधणे सुरू आहे पण या योजनेमध्ये केवळ ग्रामीण भागातील लोकांनाच विहीर मिळते शहरी भागातील लोकांना या विहिरीचा कुठलाही लाभ मिळत नाही राळेगाव शहरात नगरपंचायत असल्याने राळेगावचा समावेश शहरी भागात येतो त्यामुळे राळेगाव शहरातील शेतकऱ्यांना एमआरईजीएस या योजनेचा लाभ मिळत नाही शहरातील लोकांना केवळ धडक सिंचन विहीर योजना च्या माध्यमातून विहिरी मिळू शकतात पण 2018 19 पासून ही योजना तालुक्यात राबविल्या गेले नाही त्यामुळे राळेगाव शहरातील बहुतांश शेतकऱ्यांना विहिर मिळाली नाही हे शेतकरी विहिरीच्या प्रतीक्षेत आहे शेतकऱ्यांचा मोठा वर्ग विहिरी पासून वंचित आहे सद्यस्थितीत विहीर बांधण्यासाठी मोठा खर्च येतो गेल्या दोन-तीन वर्षापासून नापिकी व भावभाजीमुळे शेतकऱ्यांच्या कंबरडे मोडले आहे त्यामुळे शेतकरी स्वतःच्या भरवश्यावर विहीर बांधू शकत नाही शिवाय विहीर झाल्यास शेतकऱ्याकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता होईल व शेतकरी दोन तीन पीक घेऊ शकतील त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल शासनाने धडक सिंचन विहीर योजना राबवली तर राळेगाव शहरातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून विहिर मिळू शकतात नगरपंचायत एमआरईजीएस ही योजना राबवू शकते याबाबत नगरपंचायतने पुढाकार घ्यावयास हवा सद्यस्थितीत राळेगाव शहर वगळता ग्रामीण भागातील लोकांना एमआरईजीएस च्या माध्यमातून विहीर मिळत आहे या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना चार लाखापर्यंत अनुदान मिळते तसेच पंधराशे लोकसंख्येपर्यंत पाच विहिरी 1500 ते 2000 लोकसंख्येपर्यंत दहा विहीरव पुढे लोकसंख्येच्या प्रमाणात ह्या विहिरी लाभार्थ्यांना दिल्या जातात राळेगाव शहर वगळता तालुक्यातील सर्व गावात एमआरईजीएसच्या माध्यमातून विहिरी होत आहे पण केवळ राळेगाव शहरांमध्ये नगरपंचायत असल्याने हे शहर शहरी भागात येते त्यामुळे राळेगावातील लोकांना एमआरईजीएसचा या योजनेचा लाभ मिळत नाही एक तर शासनाने धडक सिंचन विहीर योजना सुरू करावी नाहीतर नगरपंचायतने याबाबतीत पुढाकार घेऊन एम आर ए जी एस च्या विहिर सुरू कराव्या जेणेकरून याचा लाभ राळेगावातील शहरातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना होईल व शहराचा विहिरीच्या बाबतीत असलेला अनुशेष कमी होण्यास मदत होईल.