केंद्रप्रमुख संघाकडून काटोल नवनिर्वाचित सभापती संजय डांगोरे यांचा सत्कार,महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, काटोलचे आयोजन

तालुका प्रतिनिधी/१७ ऑक्टोबर
काटोल – काटोल पंचायत समितीच्या सभापतीपदी संजयडांगोरे व उपसभापतीपदी निशिकांत नागमोते यांची नुकतीच निवड झाली.यानिमित्त महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शाखा काटोलच्या वतीने पं.स सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन सत्कार तथा अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना सभापती संजय डांगोरे म्हणाले की, सामाजिक चळवळीप्रमाणे शिक्षणक्षेत्रात सुध्दा खूप काम करायचे आहे. त्यासाठी शिक्षण विभागाला पाहिजे ते सहकार्य करण्यास वचनबध्द आहे. काटोल पं स.चे शिक्षण क्षेत्रात नावलौकिक करण्यास सर्व केंद्रप्रमुख बंधूंनी सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष केंद्रप्रमुख राजू धवड तर आभार प्रदर्शन सुरेंद्र कोल्हे यांनी केले.याप्रसंगी केंद्रप्रमुख नरेंद्र भोयर, नरेंद्र बोढाळे, मोरेश्वर साबळे,पांडुरंग भिंगारे, रमेश गाढवे, निळकंठ मदनकर, रामभाऊ धर्म, निळकंठ लोहकरे, महेश राकेश हे उपस्थीत होते.