मुसळधार पावसाने येवती येथील महिलेच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनल चे नुकसान

राळेगाव तालुक्यातील येवती येथील महिला शेतकरी श्रीमती कुसुम मारोतराव घुगरे यांचे शेता मधील विहिरीवर बसवलेल्या सौर ऊर्जा पॅनलचे दिनांक २१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले .
येवती येथील महिला शेतकरी श्रीमती कुसुम मारोतराव घुगरे यांचे गट क्रमांक १२३/१ मधील शेतातील विहिरीवर सौर ऊर्जा पॅनल बसविले होते . ते सध्या तालुक्यात आलेल्या 21 जुलै रोजी च्या मुसळधार पावसाने त्या सौर ऊर्जा पॅनलच्या प्लेट फुटल्या व पॅनलचे खूप नुकसान झाले. त्यामुळे ही महिला शेतकरी खूपच विवंचनेत असून सौर ऊर्जा प्लेटच्या झालेल्या नुकसानाची शासनाकडून भरपाई मिळणार का याकडे या महिला शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे . सौर ऊर्जा पॅनलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने पंचनामा सुद्धा केला आहे तेव्हा शासनाकडून काय मदत मिळते याकडे सदर महिला शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.