
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी
दिनांक दोन तारखेला ढाणकी शहरातील हनुमान दुर्गोत्सव मंडळाच्या सभा मंडपात पारंपारिक पद्धतीने गोंधळ घालण्याचा कार्यक्रम पार पडला या गोंधळाच्या कार्यक्रमाला परभणीचे सुप्रसिद्ध गोंधळी माणिक नरवडे यांची उपस्थिती होती तत्पूर्वी मंडळाच्या वतीने प्रशांत जोशी यांनी विधिवत पूजा केली व तदनंतर लगेचच गोंधळी बुवांनी शारदीय नवरात्र उत्सवाला अनुसरून अंबाबाईच्या अनेक कथा ऐकवल्या व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर संबळ आणि तुंतुन्याच्या तालावर आरत्या म्हणल्या यामुळे भाविकांचे कान मात्र तृप्त झाले.
या कार्यक्रमाला गावचे प्रतिष्ठित नागरिक धीरज गोडगिरवार व त्यांच्या सहचरणी पल्लवी कोडगिरवार यांची उपस्थिती होती.
