परिस्थितीचा बाऊ करून थांबू नका …..सातत्य ठेवा, यश आपलेच ! डॉ.प्रविण येरमे

 

ग्राम आरोग्य सेना फाऊंडेशन, गोंदोला समूहाच्या वतीने पाटण येथे जगावे समाजासाठी ! या संकल्पनेतून मिशन ग्रॅज्युएट भव्य शैक्षणिक, सामाजिक तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पदवीप्राप्त विद्यार्थीचा गौरव समारंभ कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी मी असा घडलो ! या विषयावर अनुभव कथन करताना डॉ.येरमे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शांतारामजी उईके, मुख्यवक्ते दिलीप सोळंके, प्रा.विठ्ठल आत्राम , उद्घाटक डॉ.प्रविण येरमे, डॉ.शारदा येरमे , प्रमुख पाहुणे रमेश कुंभरे,पंढरी मरस्कोल्हे, दुष्यंन्त कन्नाके मधुकर कोटनाके आदी उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या नैसर्गिक कला गुणाकडे लक्ष्य दिले पाहिजे असे मत अध्यक्ष प्रा.शांतारामजी उईके यांनी यावेळी व्यक्त केले.
निव्वळ पदवी प्राप्त करण्यापेक्षा एकविसाव्या शतकाचे आव्हान पेलणारा दर्जेदार विद्यार्थी निमार्ण व्हायला असे मत याप्रसंगी बोलताना मुख्य वक्ते दिलीप सोळंके यांनी व्यक्त केले . स्पर्धा परीक्षा नियोजन व तयारी या विषयावर प्रा.विठ्ठल आत्राम यांनी पदवीधर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पदवी प्राप्त करणाऱ्या तीस विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
उपक्रमाच्या सहआयोजिका डॉ.शारदा येरमे , डॉ सुधाकर मडावी , डॉ. प्रमोद परचाके , रुग्णसेवक नागो मेश्राम, संजू सोयाम, लक्ष्मण कुळसंगे, नितीन आंभोरे, विद्यार्थीसेवक अमृत आत्राम , शंकर मेश्राम, किशोर मंदे, देवराव मेश्राम, फुलचंद मडावी, ग्राम आरोग्य सेना फाऊंडेशन रुग्णसेवक टीम, गोंदोला समूह विद्यार्थी सेवक टीम, जिल्ह्यातील सर्व शिक्षणप्रेमी तथा पोलीस प्रशिक्षण केंद्र पाटण येथील विद्यार्थी व पाटण येथील ग्रामस्थ उपस्थित होते.