
प्रतिनिधी//शेख रमजान
उमरखेड तालुक्यातील जेवली येथे समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीनिवास करतार पडवाळे (28) रा. जेवली याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समुदायाला अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर जेवली ग्रामपंच्यायत कार्यालय व्हाट्सअँप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे बौद्ध समुदायाचे भावना दुखावल्याने गावातील बौद्ध अनुयायांच्या गटाने बिटरगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार देत.पोस्ट करणाऱ्यावर अट्रॉसिटी कायदानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर आरोपी विरुद्ध बिटरगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
