
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
शासन प्रशासन व जनतेच्या एकत्रित प्रयत्नातूनच विकास साधल्या जाऊ शकतो. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे द्वारे याच बाबीला समोर ठेऊन विकासात्मक योजनांना प्राधान्य दिल्या जाते. असे प्रतिपादन आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा मोहिमेअंतर्गत तहसील कार्यालय,राळेगाव येथील समाधान शिबीरात ते बोलत होते (दि. ०३ ) आ. प्रा .डॉ. अशोक उईके यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेकडो नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यात आल्या तर अनेकांना लाभाच्या योजनांचे वाटप या शिबिरात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व महसूल विभागाच्या योजना व तालुक्यातील विविध योजनांची अंमलबजावणी बाबत तहसीलदार डॉ. रविंद्रकुमार कानडजे, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी तालूका व उपविभागीत विविध योजना व लाभ बाबत माहिती विशद केली. त्याचबरोबर केशव पवार साहेब गट विकास अधिकारी प.स. राळेगाव, हटकर साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी राळेगाव, आपआपल्या विभागाच्या योजना व तालुक्यातील झालेली अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन केले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. डॉ.अशोक उईके यांनी विविध विभागाच्या योजना लाभांश व तालुक्यातील सर्व विभागाकडून झालेली अंमलबजावणी आणि आगामी दिवसात नागरिकांना देण्यात येणाऱ्या योजना साठी सर्व विभागाचे समन्वयक भूमिका मार्गदर्शन करून नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांचे जास्तीत जास्त लाभ यासाठी आव्हान केले. त्यानंतर लोकप्रतिनिधी मा.आमदार साहेब व मा.सर्व अधिकारी यांचे हस्ते महसूल विभाग,ग्राम विकास विभाग,कृषी विभाग,वन विभाग,आरोग्य विभाग इत्यादी सर्व विभागाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना साहित्य व शेतकरी आत्महत्या मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
वन समिती अध्यक्ष व सरपंच यांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच विभागाकडून कोविड काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आशा सेविका यांना सुद्धा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येऊन आजच्या समाधान शिबिरात विविध विभागाकडून मोठ्या प्रमाणात विविध योजनेचा लाभ देण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालक अनुप जामोदकर तालुका व्यवस्थापक यांनी केले व आभार प्रदर्शन दिलीप बदकी नायब तहसीलदार यांनी केले.
🔸समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध लाभाच्या योजना असेल, तक्रारी असतील त्या एकाचं ठिकाणी, लवकरात लवकर सोडविण्याला प्राधान्य दिल्या जाते. यंदा अतिवृष्टी ने तालुक्यात हानी झाली माझा शेतकरी, कष्ट्करी बांधव संकटात आहे. त्याला बळ देण्याचे कामं करा, विविध विकासाच्या योजना गरजू पर्यंत पोहचवा, असे निर्देश विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना दिले आहे. अतिवृष्टी ची मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या शिबिरात विविध स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्याचा सत्कार करतांना आनंद झाला. जात प्रमाणपत्र, अधिवास, उत्पन्न प्रमाणपत्र, आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला निधी वाटप, 100% आधार जोडणी, घरकुल, जीवन मिशन, ट्रॅकर अनुदान अशा विविध योजनेतील लाभार्थीना साहित्य तथा धनादेश वितरित करण्यात आले. या निधीचा योग्य विनियोग करा, मिळालेल्या साहित्यातून प्रगती साधा, इतरांना ही रोजगार देण्याचा प्रयत्न करा. विकासाची गँगोत्री ही शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला न्यायची आहे. त्या करीता शासन, प्रशासन व जनता यांना एकत्रित कामं करावे लागेल.
आ. प्रा. डॉ. अशोक उईके
