
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाला योग्य दिशा देणारे समाजभूषण स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची जयंती आज दिनांक 1 तारखेला वडते सर यांच्या निवासस्थानी सायंकाळी सात वाजता साजरी करण्यात आली.त्या कार्यक्रमात सर्व प्रथम वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यांतर सर्व उपस्थित समाजाच्या सर्व मान्यवर मंडळींनी प्रतिमेचे पूजन केले.त्याच सोबत आज दिनांक 1 तारखेला बंजारा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रूपेश जाधव आणि श्रीमती जयश्री देविसिंग आडे यांचा वाढदिवस असल्याने केक कापून व शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यांनतर संघटनेचे पदाधिकारी ताराचंद पवार यांनी वसंतराव नाईक यांच्या जिवनचरित्रावर व केलेल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश चव्हाण सर यांनी मानले.त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्रावणसिंग वडते, ताराचंद पवार, रमेश चव्हाण, रुपेश जाधव, निखिल आडे, शिवाजी जाधव, संतोष चव्हाण, सौ प्रमिला चव्हाण, सौरभ चव्हाण, सौ शितल जाधव, सौ मानता चव्हाण, सौ रेखा आडे, सौ. वैशाली पवार,श्रीमती जयश्री आडे, सौ.पायल जाधव, सौरभ वडते कु. पल्लवी आडे , दिव्या राठोड, सौ गिता वडते, सर्वेश राठोड राळेगावकर, श्रुषी कुमार जाधव यांच्या सह अनेक बंजारा बंधू भगिनीं उपस्थित होते.
