

सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग आयुक्तालय पुणे क्रीडा संचनालय पुणे व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने दिव्यांग मुलामुलीचे राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असता राज्यातून दिव्यांगा च्या सर्वच प्रवर्गाच्या विध्यार्थी नी जे जिल्हा स्तरावरून प्रथम आले होते त्या सर्वच दिव्यांग स्पर्धेकांचा या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग होता या मध्ये मधुकरराव नाईक निवासी मूक बधिर विद्यालय ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे वर्ग 9 मध्ये शिकत असलेला विध्यार्थी करण नामदेव राठोड याने आपल्या जिद्द व चिकाटीने मूक बधिर प्रवर्गाच्या 17 ते 21 या वयोगटात लांब उडी या खेळात राज्यातून द्वितीय येऊन विद्यालयासह जिल्ह्याची मान उंचावली एकदम हलकीची परिस्थिती असलेल्या त्याच्या आई सौ गोदाबाई व वडील नामदेव राठोड यांचे नाव लौकिक केले असून त्याच्या या यशा बद्दल त्याच्या मूळ गाव निगनूर वासियांनी दि 21/2/2023रोज मंगळवार ला भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला या सोहळ्याला सर्व ग्रामवासियांनी उपस्थिती दर्शविली होती निगनूर येथील सरपंच श्री शुरेश बरडे. पुलिस पाटील.श्री उत्तम मुडे. प्रतिष्टीत नागरिक. ब्रिजलाल मुडे उपस्थित होते स्व. चांदीबाई शिक्षण संस्थेचे मानद सचिव श्री शेषराव पवार साहेब व सदस्य श्री सुदर्शन भाऊ पवार यांनी विध्यार्थी करण राठोड व क्रीडा शिक्षक श्री एस. आर. आडे सर यांचे अभिनंदन केले आहे विध्यार्थीनी आपल्या या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक आडे सर व मार्गदर्शक श्री शंकर चव्हाण सर यांना दिले आहे
