ढाणकी: ढाणकी दत्त मंदिर येथे चातुर्मास, समाप्ती सोहळा संपन्न

ढाणकी प्रतिनिधी: प्रवीण जोशी.

मागील चार महिन्या पासून दत्त मंदिर येथे नामस्मरण तथा पहारा सुरू होता.येथे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत. तीन ,तीन तासाचे पहारे चालू असत. सकाळ, संध्याकाळ आरती व नित्य नेम रोज महापूजा मांडण्यात येत असे. त्यानिमित्त आज दत्त मंदिर येथे चातुर्मास सोहळा समाप्ती संपन्न झाली. माहूर येथील वडगुंठा श्री संत बाळगीर नारायण गिरी महाराज हे आले होते. रात्रन दिवस अखंड नामस्मरण चिंतन , महाप्रसाद व रात्री महापूजा मानडण्यात आली होती. महापूजा प्रभू पाटील पोटा येथील पुजारी यांनी मांडली होती तर भजनी मंडळ ढाणकी व कोपरा येथील उपस्थित होते. व गावातील भक्त मंडळी ही बहू संख्येने उपस्थित होती. आनंद माझी माता |आनंद माझा पिता| नाही मज चिंता कदा काळी||१||चालता फिरता| आनंद नाम वाचे| मग या काळाचे काय भय||२|| वरील अभंग प्रमाणे खरंच आनंद देव दत्त हे माझे माता पिता समान आहे. एवढे दत्त महाराज माझ्या संगेअसताना मला कशाचीही चिंता नाही. साक्षात यमरुपी काळ जरी आला तरी मला आनंद नामामुळे या काळाचे भय नाही. कारण माझ्या मुखा मध्ये चालता फिरता ,उठता बसता, रात्रंदिवस दत्त महाराजाचे चिंतन असते.खरंच माझे एकच देवाला मागणे आहे ते म्हणजे, एकची द्या वरदान दत्त दत्त म्हणता जावो प्राण. या पदा प्रमाणे हे भगवंता हे परमेश्वरा , दत्त महाराज मला मृत्यू जरी आला तरी त्या गोष्टीची चिंता नाही. फक्त मृत्यू येतेवेळी माझ्या मुखातून दत्तदत्त नाम हेच उच्चार निघावे हेच तुला वरदान मागने आहे. देवा नको रे तुझं मला काही| तुझ्या नामाची गोडी मला द्यावी|| नको शेतीवाडी नको धनसंपदा|तुझी कोमल मूर्ती माझ्या हृदयी राहो||1|| हे दत्तराया,भगवंता मला तुझ्या कडून काहीही मागणे नाही.ना धन संपदा,ना शेती वाडी ,नाही बंगला गाडी फक्त माझे एकच मागणे ते म्हणजे फक्कत आणि फक्कत तुझ्या नामाची गोडी मला सतत असावी. व तुझी कोमल मूर्ती माझ्या हुर्दयात राहावी.आणि मला तुझ्या नामाचा विसर कधीच होऊ नये एवढेच मागणे आहे.या प्रमाणे सतत चार महिने चातुर्मास झाला व नुक्तीच काल चातुर्मास समाप्ती महापूजा , व प्रातकाळी काकडी आरती घेऊन सांगता झाली. आंनंद नामाने भक्तिमय वातावरणात ढाणकी नगरी दुमदुमून निघाली.