
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाठोडा येथील बेबीबाई चोखोबा शंभरकर वय ६५ वर्ष ही दिं १५ सप्टेंबर च्या सकाळी ११ वाजताच्या दरम्यान शेतात गेली असता विद्युत करंट लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अतुल शंभरकर यांनी त्यांच्या शेतातील असलेल्या पिकांची जंगली जनावरे नासधूस करीत असल्याने जंगली जनावरांपासून पिके वाचविण्याकरिता अतुल शंभरकर यांनी शेताच्या सभोवताल विद्युत करंट लावत असे व सकाळी जावून विद्युत करंट काढून ठेवत असे मात्र नदी पोळ्याच्या दिवशी करंट लावून असल्याची अतुल ला आठवण राहिली नसल्याने विद्युत करंट सुरू होता त्याच दिवशी बेबीबाई शंभरकर ही चवळीच्या शेंगा आणण्याकरिता शेतात जात असताना ती तिच्या शेताचा रस्ता सोडून ती तिच्या पुतण्याच्या शेतातून जात होती मात्र तिला विद्युत लावलेला तार दिसला नसल्याने ती सरळ जात असतानाच तिला विद्युत करंट लागून जागीच मृत्यू पावली
या घटनेची माहिती अतुल शंभरकर हा १२ वाजताच्या दरम्यान शेतात गेला असता बेबीबाई ही मृतावस्थेत आढळून आली तेव्हा या घटनेची माहिती गावातील नागरिकांना कळताच तान्हा पोळ्याच्या दिवशी बेबीबाईचा दुर्दैवी मृत्यू झाला शोककळा पसरली आहे या बाबतची राळेगाव माहिती पोलीस मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पाटील करीत आहे.
