
वणी :- स्थानिक बेरोजगाराना रोजगार मिळावा या करिता ता. १८रोजी ब्राह्मणी निळापूर मार्गावरील कॉल वॉशरीजचा कोळसा रोको आंदोलन घेण्यात आले होते. यावरून वॉशरीज धारकाने बुधवारी एक बैठक लावली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन सर्व बेरोजगारांना रोजगार देण्याचे ठरले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी आंदोलन छेडले होते. यात आज ता. २०, रोजी दुपारी १ वाजता कोल वॉशरीजच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, वणी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप भोयर व युवा आघाडीचे शहराध्यक्ष विशाल कांबळे, कोल प्रशासनाचे वाईस प्रेसिडेंड मोहन रूधाणी, व व्यवस्थापक इम्रान शेख आणि बेरोजगारांना घेऊन बैठक संपन्न झाली असून यात सर्व बेरोजगारांना पुढच्या ३ तारखेला मुलाखतीसाठी बोलवण्यात आले असून मुलाखती नंतर लागेच कामावर रुजू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी निळापूर गावातील असंख बेरोजगार तरुण व महिला उपस्थित होत्या.
