
तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा! मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ व पालकमंत्र्यांनी दखल घेणार का!
विद्यमान आमदार नामदेवराव ससाने यांचे उमरखेड व महागाव पंचायत समिती अंतर्गत शून्य शिक्षक शाळा कडे दुर्लक्ष! विद्यार्थ्यांचे होत आहे प्रचंड नुकसान!
देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास 76 वर्ष होत आहेत परंतु आजही शिक्षणाची दयनीय अवस्था आहे शिक्षण हक्काचे म्हणून सरकारने राईट टू एज्युकेशन हा कायदा बनवला आहे त्या कायद्यानुसार अनेक गोरगरीब सामान्य पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकत आहेत परंतु विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच जर नसतील तर अशा शून्य शिक्षक शाळात विद्यार्थ्यांचे भविष्य कसं बनणार ?हा भयानक प्रश्न महागाव व उमरखेड पंचायत समिती अंतर्गत शून्य शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे याची गंभीर दखल पालकमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी व उमरखेड महागाव विधानसभेच्या आमदार नामदेवराव ससाने यांनी घेणे जरुरी आहे
याची गंभीर दखल आमदाराने जरी घेतली नाही तरी भावी आमदार भाविक भगत यांनी नक्कीच घेतली आहे त्यांनी भाविक भगत हेल्प फाउंडेशन च्या माध्यमातून शिक्षण अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेच्या सीईओ ला तक्रार करून त्यांचे ह्या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीवर शेरा देखील मारला आहे .
महागाव पंचायत समिती अंतर्गत एकूण बारा गावात शून्य शिक्षक शाळा आहेत तर उमरखेड पंचायत समिती अंतर्गत आठ शून्य शिक्षक शाळा आहेत महागाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा शिरमाळा, जि प शाळा हिवरदरी, जि प शाळा वाघनाथ जुने, जि प शाळा मथुरा तांडा, जि प शाळा सेवा नगर ,जि प शाळा थार ,जि प शाळा टेंभी
जि प शाळा कासर बहेळ , जि प शाळा हिवरा उर्दू जि प शाळा पेढी उर्दू जि प शाळा पिंपरी जुने जि प शाळा करंजखेड नवे ह्या महागाव तालुक्यातील 12 शाळेमध्ये शून्य शिक्षक आहेत तर उमरखेड पंचायत समिती अंतर्गत भोजू नगर एक व भोजनगर दोन डोंगरगाव, कुरळी, झाडगाव, अमडापूर, टाकळी, आणि दिवट पिंपरी उमरखेड तालुक्यातील अशा आठ शाळा शून्य शिक्षक शाळा आहेत*
उमरखेड व महागाव पंचायत समितीच्या अंतर्गत येत असलेल्या एकूण 20 शून्य शिक्षक शाळा मध्ये शिक्षक भरती केव्हा होणार हा प्रश्न तेथील पालकांना व विद्यार्थ्यांना पडत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे ही बाब भाजपाचे नेते तथा एक समाजसेवक त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून महागाव उमरखेड पाहत आहे असे भाविक भगत यांनी जिल्हा परिषद यवतमाळच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रार करून महागाव पंचायत समितीच्या शून्य शिक्षक शाळांमध्ये तथा उमरखेड च्या शून्य शिक्षक शाळांमध्ये तात्काळ कंपल्सरी शिक्षक भरती करावी व नंतर इतर भरती करावी अन्यथा शिक्षण समितीचे कार्यकर्ते व भाविक भगत हेल्प फौंडेशनचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही त्याची सर्व जबाबदारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील असा इशारा त्यांनी तक्रारीतून दिला आहे यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड विधानसभेमध्ये महागाव उमरखेड मध्ये एकूण वीस शून्य शिक्षक शाळा असाव्यात हीअतिशय शरमेची बाब आहे याची सर्वांना लाज वाटायला पाहिजे असे खडे बोल भाविक भगत यांनी जिल्हा प्रशासनाला सुनावले आहेत भाविक भगत त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहिले जाते भाविक भगत यांचा आरोग्य असो शिक्षण असो की विविध क्षेत्रातील जनतेची कामे असो सदर जनतेची कामे प्रामाणिकपणे हाताळण्याचा प्रयत्न करतात भाविक भगत यांना आमदारकी नसताना हे जमते मग विद्यमान आमदार नामदेवराव ससाणे यांना का जमत नाही? तसेच इतर पक्षाचे राजकीय नेते देखील याबाबत गप्प का आहेत? हा प्रश्न उमरखेड व महागाव तालुक्यातील जनतेत उपस्थित झाला आहे तुर्तास एवढेच!
