
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव प स अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथील वर्ग दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी शाळेला विशेष भेट वस्तू दिल्या. परंपरागत फोटो देण्याऐवजी विज्ञान शिक्षक श्री व्हि. एन. लोडे यांच्या मार्गदर्शनात प्रयोग साहित्य देण्यात आले. सदर उपक्रमात अर्णव गुरणुले , युगांक सातघरे, गुरुदेव गेडाम, तेजस्विनी पवार, संस्कृती गाऊत्रे, रसिका राऊत, दीपिका पेन्दोर , रोहिणी गेडाम, सुहानी येरणे, मयुरी शेंडे, पूर्वा खंडाळकर, योगेश्वरी वाडगुळे, नंदिनी लोनबले, सुवर्णा राऊत यांचा समावेश होता. वरील सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री टी झेड माथनकर यांनी कौतुक केले. याप्रसंगी पी पी आसुटकर आर एस वाघमारे बी बी कामडी वी टी दुमोरे एस एम बावणे एस वाय भोयर तथा सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
