डिझेल बचत करून डेपोच्या उत्पादनात आर्थिक सहकार्य करा: विभागीय नियंत्रक अमृत कचवे यांचे आव्हान

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आगाराचा सर्वात महत्त्वाचा उत्पन्न वृद्धीचा भाग म्हणजे डिझेल होय आज राळेगाव आगाराचा विचार करता एकूण ४०% आर्थिक खर्च हा डिझेलवर होत असतो जर आगाराचे आर्थिक उत्पन्न वाढवायचे असतील आणि आगाराला स्वयंपूर्ण बनवायची असतील तर आपल्याला प्रत्येकाने आपली एक सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी समजून डिझेल बचत करणे ही काळाची गरज झालेली आहे त्यामुळे प्रत्येक चालक वाहकाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन डिझेल बचत उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन यवतमाळ विभागाचे विभागीय निमंत्रक अमृत कचवे यांनी राळेगाव आघात डिझेल बचत पंधरवड्याची सुरुवात करताना कर्मचाऱ्यांना सूचना दिली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक अशोक पिंपरे हे होते त्यांनीही आधाराच्या उत्पन्नात डिझेल बचत ती कशी महत्त्वाची आहे त्याचबरोबर ती एक आपली राष्ट्रीय जबाबदारी म्हणून प्रत्येकाने पार पाडावी असे मार्गदर्शन केले याप्रसंगी आगार प्रमुख शशिकांत बोकडे यांनीही विचार व्यक्त केले उपस्थित पाहुणे व सर्व कर्मचाऱ्यांनी आगारावर फीत कापून डिझेल बचत पंधरवड्याची करीत असा सुरुवात केली याप्रसंगी सहाय्यक व्यवस्थापक गणेश शिंदे सहाय्यक वाहतूक नियंत्रक गजानन पोल्हे. भीमसेन भवरे महेश गलांडे दिपाली गयलोत यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सतीश डाखोरे यांनी केले