दहेगाव येथे डिपीच्या केबलचा करंट लागुन गाईचा मृत्यू, वडकी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुक्या जनावरांचा जिव गेला

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे वार्ड न २ परिसरातील डिपी आहे त्या डिपीची पुर्ण दुरवस्था आहे ते दुरुस्ती करण्यासाठी दहेगाव येथील नागरिकांनी वडकी महावितरण अभियंता पवन गिरी व लाईनमन जाधव यांना वारंवार माहिती देऊन सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्या दुर्लक्ष पणामुळे आज दि २० जुलै शनिवार ला सायंकाळी ६ वाजता दहेगाव येथील भारत तुरणकार यांच्या मालकीची गाय डिपीच्या केबलला करंट लागुन मरण पावली सदर घटनेची माहिती विद्युत अभियंता पवन गिरी यांना दिली ते आपल्या सर्व टिम सहीत घटना स्थळी दाखल होऊन चौकशी केली व पंचनामा केला तसेच गाईच्या मालकाला नुकसान भरपाई देण्यासाठी आश्वासन दिले सदर अहवाल वरिष्ठांकडे पाठवुन लवकर लवकरात मदत देण्यात येईल असे सांगितले वडकी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे निरपराध गाईची जिव गेला त्याठिकाणी एकदा माणसाला जर करंट लागला असता किती मोठा अनर्थ घडला असता असा निष्काळजीपणा करणा-या अभियंता व लाईनमन कारवाई करावी अशी मागणी दहेगाव येथील नागरिक करित आहे