
प्रतिनिधी:प्रवीण जोशी , ढानकी
शहरातील वसंतनगर ( फैल ) येथील नामदेव कवाणे यांच्या विहिरीत पाटील नगर बोरबन येथील 40 वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मुत्यू झाल्याची घटना दि.19 नोव्हेंबर रोजी घटली.
वसंत नगर (फैल ) येथील नामदेव यादव कवाने यांच्या विहीरीत देवा भिवाजी पंडीत वय 40 वर्षे रा . पाटील नगर (बोरबन ) येथील तरुणांची विहीरीत पडून मुत्यु झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजता च्या सुमारात घडली .
नामदेव यादव कवाने रा . वसंत नगर (फैल ) यांनी सकाळी 11 वाजता आपल्या विहिरीजवळ मोटर पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत एक मृतदेह तरंगत असताना दिसले असता आरडाआरडा करत आजूबाजूच्या लोकांना कळविले व लोक जमा झाले. त्याक्षणी मृतदेह तरंगत दिसला असता पोलीस स्टेशन उमरखेड येथे कळविण्यात आले व घटनास्थळी पोलीसांनी पोहचून मृतदेह विहीरीतून तेथील तरुणांच्या सहकार्याने बाहेर काढून
पंचनामा करून मृतकाची ओळख पटवून नातेवाईकांना बोलून मृत शरीर शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय उमरखेड येथे पाठवण्यात आले. मृत्यूचे कारण अद्यापही न कळल्याने पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलास नेवकर व पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब मस्के करीत आहेत .
मृतक देवा भिवाजी पंडित यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, असा अल्प परिवार आहे मृतक देवा पंडित हा एका धाब्यावर स्वयंपाकीचे काम करत होता वृत्त कळताच सर्व नातेवाईकां व मित्रांमध्ये शोकळका पसरली आहे.
