
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपरी दू. येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची राहूल मेश्राम यांनी भेट घेवून त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांच्या घरातील बहिणीच्या पुढील शिक्षणाकरीता मदत करण्याची जबाबदारी ही राहूल मेश्राम यांनी घेतली आहे.
काही दिवसापूर्वी, राळेगाव तालुक्यातील गाव (पिपंरी दुर्ग) या गावातील एका युवा शेतकरी, स्वर्गवासी आदित्य डोमकावळे यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
या घटनेमुळे सगळ्या डोमकावळे कुटुंबावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळला . घरातील कर्ता मुलगा आपल्यातून निघून गेला. याच दुःख परिवाराला आहे. काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी आदित्य डोमकावळे यांचे वडिलांनी सुद्धा आपली जीवनयात्रा संपविली होती.
आणि आता स्वर्गवासी आदित्य डोमकावळे यांनी पण या जगाचा निरोप घेतला.
घरच्यांच्या सांगण्यानुसार
कर्जबाजारी पना मुळे या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचललं अस ते सांगतात.
या घटनेची माहिती होताच.
राहूल मेश्राम यांनी पिपंरी दुर्ग या गावात जावून.
कुटुंबाची भेट घेवून त्यांच सांत्वन केलं. व त्यांना धीर दिला. घरात असलेल्या बहिणीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी
व तिला शिक्षणासाठी लागत असलेली मदत करण्याची ग्वाही दिली.
बॉक्स
या राळेगाव तालुक्याचा मी भूमिपुत्र आहे.
तालुक्यातील लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन.
त्यांना मदत करणं हे माझे कर्तव्य असल्याचं मत
राहूल मेश्राम यांनी व्यक्त केलं.
