
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगांव येथे जनावरे बांधण्याच्या गुरांच्या गोठ्याला भिषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री २:०० च्या सुमारास घडली या आगिमध्ये २ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून २ बैल गंभीर भाजले आहे राळेगाव येथील शेतकरी मारोतराव ठोंबरे यांच्या जनावरांच्या गोट्याला आग लागली ही आग एवढी भीषण होती की त्यात लाखोंचे नुकसान झाले.
या आगिमध्ये एक बैल पूर्णपणे जळून मरणाच्या दारात उभा आहे आणि एका बैलाचा दोर तुटल्यामुळे अर्धवट जळुन निकामी झाला आहे दोन वासरे (गोऱ्हे) जळून खाक होऊन मरण पावले गोठ्यामध्ये ठेवलेली एक मोटारसायकल, तीन सायकल, बैलगाडी जळून खाक झाली तसेच शेतीला लागणारे अवजारे जळून खाक झाले गोठा पुर्णपणे खाक होऊन शेतकरी मारोतराव ठोंबरे यांचे अंदाजे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार सिताराम मेहेत्रे घटना स्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली तशेच तहसील दार साहेब व नगर पंचाय चे कर्मचारी पण पाहणी करण्यासाठी हजर होते या घटनेचा पुढील तपास राळेगाव पोलीस स्टेशन करीत आहे
