
भद्रावती तालुक्यातील कुचना येथील युवासेना शाखा प्रमुख श्री.तपस्वी भाऊ कुळसंगे
यांच्या वाढदिवसानिमित्ताने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना तपस्वी भाऊ कुळसंगे आणि त्यांच्या युवासेना ग्रुप तर्फे फळ आणि बिस्कीट चे वाटप केले. आनंदवन येथील मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सोबत केक कापून व फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेने सामाजिक कार्य करण्यात आले.
