राळेगाव तालुका काॅग्रेस कमिटीच्या वतीने बैलबंडी व टॅक्टरचा भव्य धडक मोर्चा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव येथे दि .12 -9-2022 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता तालुका काॅग्रेस कमीटी राळेगाव च्या वतीने भव्य बैलबंडी व टॅक्टर चा भव्य असा मोर्चा माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके ,व यवतमाळ जिल्हा काॅग्रेस अध्यक्ष प्रफुलभाऊ मानकर यांच्या नेतृत्वात आयोजीत केला आहे.
राळेगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर,बेरोजगार युवक हे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने त्रस्त झालेले आहे .तसेच शासनाच्या घरकुल योजनेतील जाचक अटी ,जिवनाश्यक वस्तुवरील जीएसटी,पेट्रोल ,डिझेल,गॅस सिलेंडरची दरवाढ झालेली असताना तसेच महागाईने उच्चांक गाठलेला असताना सुद्धा महाराष्ट्र व केंद्रातील भाजपाचे सरकार झोपी गेलेले आहे.वरील सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी राळेगाव तालुका काॅग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालायावर बैलबडी ,व टॅक्टररचा भव्य मोर्चा आयोजीत केला आहे,या मागण्या मंजुर कराव्यात 1) राळेगाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करा.२)वाढलेली महागाई त्वरीत कमी करण्यात यावी ,३)बेरोजगार युवकांना रोजगार त्वरीत देण्यात यावा ,४)पुरामुळे क्षतीग्रस्त झालेल्यानां तात्काळ घरकुल देण्यात यावे ,तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे,५)अतिवृष्टी व पुराणे खचलेल्या विहीरी शासकिय निधीतुन बाधुन देण्यात याव्या ,६)पुरामुळे वाहून गेलेल्या शेतजमीनीला सरसकट मदत देण्यात यावी,७)शेततळे विहीरीनां कृषीपंपासाठी विज जोडणी तात्काळ देण्यात यावी ८)शेतकऱ्याना पीकवीमा मिळण्यात यावा,९)ई-पीक पाहणी तलाठी यांनी करावी .या सर्व मागण्यांसाठी सर्व राळेगाव तालुक्यातील खेडयो पाडी येथील शेतकरी ,शेतमजुर या सर्व लोकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके व यवतमाळ जिल्हा काॅग्रेस अध्यक्ष प्रफुलभाऊ मानकर तसेच राळेगाव काॅग्रेस, शहर काॅग्रेस राळेगाव यांनी सांगीतले आहे.