डॉ. तक्षशिला मोटघरे यांना महत्वाचा शासकीय जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी::प्रवीण यवतमाळ
प्रविण जोशी


महिला व बाल विकास
क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिल्या जातो.डॉ.तक्षशिला मोटघरे यांच्या कार्याची दखल घेत यांना सन 2015-16 चा जिल्ह्यास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. सध्या त्या महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क, यवतमाळ येथे कार्यरत असून समाजकार्यात महिला आरोग्य , बालशिक्षण आणि सामाजिक समस्यापर जनजागृती यावर त्यांचा विशेष भर दिसून येतो. या पुरस्काराकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील वाशिमकर, मा. पवन ठाकरे, समस्त प्राध्यापक वर्ग व शिक्षेकत्तर कर्मचारी तसेच सौ. कीर्ती पदमावार(अध्यक्ष-संस्कार कलश एकता गृप), सौ.अमृता येरावार(अध्यक्ष-रोटरी इनरव्हील गृप), पती श्री. निलेश चहांदे व समस्त मोटघरे परिवार यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.