
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेची सभा दिं २७ जून २०२३ रोजी नुकतीच पार पडली असून राळेगाव तालुका शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सी के शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शेख लूकमान शेख रहमान तर सूचक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सरलाताई देवतळे या उपस्थित होत्या यावेळी विस्तार अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर कीन्नाके यांच्या मार्गदर्शनानुसार सभा पार पडली आहे सभेदरम्यान सी के शेळके यांनी केलेल्या यांच्या कार्यकाळात प्राथमिक शिक्षक व पदापासून त्यांच्या नोकरीला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या कर्तृत्व प्रामाणिकतेमुळे मजल दर मजल करत शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर पोहोचले त्यांनी ९ वर्ष केंद्र प्रमुख या पदावर कार्य करीत असताना विद्यार्थी हिताच्या अनेक उपक्रम योजना राबविल्या असल्याची माहिती या सभेदरम्यान देण्यात आली सदर सभेला सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते या. सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी साधक-बाधक चर्चा करण्यात आली यावेळी सभेला शिक्षक महेश सोनेकर, प्रवीण कोल्हे, सागर धनालकोटवार, हरिदास वैरागडे, सुरेश कुंभलकर, सतीश आत्राम, लक्ष्मण ठाकरे, जगदीश ठाकरे, अनिल वरुडकर, सुभाष पारधी, आदी शिक्षक उपस्थित होते
