ट्रॅक्टर – ऍक्टिवा च्या अपघातात एकाचा मृत्यु ,दुसरा गंभीर जखमी,24 तासानंतरही कोणतीही कारवाई नाही,पोलीस प्रशासन सुस्त का?

वरोरा तालुक्यातील पांझुर्णी येथून वरोरा शहराकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक्टर च्या धडकेत 17 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान स्कुटी चालक रियाझ खाँ पठाण व छत्तीसगड येथील रहिवासी अज्ञात इसम हे गंभीर जखमी झाले . या अपघातात जखमी झालेल्याना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले.जखमीवर प्राथमिक उपचार करून जखमी रियाझ खाँ पठाण (32) यांना प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथिल एम्स हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले. त्यांनतर अज्ञात इसमाला उपचाराकरीता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले.रियाझ खाँ पठाण यांचा काळ रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की ट्रॅक्टर क्र. MH 29 C 7612 हे वाहन मधेली कडे जात होते.तर ऍक्टिवा स्कुटी MH 34 BC 3483 हे वाहन पांझुणी येथून वरोरा शहराकडे येत होते .वनोजा- वरोरा मार्गाच्या मध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर ने ऍक्टिवा स्कुटी ला धडक दिल्याने स्कुटी वरील मृतक रियाझ खाँ पठाण व छत्तीसगढ येथील रहिवासी एक अज्ञात इसम गंभीर जखमी झाले .ट्रॅक्टर चालक व अन्य 4 सहकारी ट्रॅक्टर जागेवरच सोडून पसार झाले तर जखमींना नागरिकांनी उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने रियाझ खाँ पठाण यांना नागपूर येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले असता रियाझ खाँ पठाण यांना मृत घोषित करण्यात आले. मृतकाच्या मागे आई वडील पत्नी ,2 वर्षाची मुलगी व एक महिन्याचा मुलगा आहे.
अपघातग्रस्त ट्रॅक्टर हे लाकूड वाहतूक करण्याकरिता होत असल्याची माहिती आहे. संबंधित मालक हा वणी येथीलअसल्याचे समजते.

अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन आज दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.घटनास्थळी आज दुपारी दोन च्या दरम्यान जात घटनास्थळाचा पंचनामा केल्याची माहिती आहे. या सर्व प्रक्रियेला 24 तासाचा अवधी लागला .त्याबाबत या सर्व प्रक्रियेला उशीर का झाला असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.याला दप्तर दिरंगाई म्हणता येईल का असाही प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

24 तासाच्या अवधीनंतर पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने मृतकाच्या परिवारजणामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.मृतकाच्या परिवारजणांनी उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या कार्यालयात दाखल झाले ,व आरोपीवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत दफनविधी करणार नाही असा पवित्रा घेतला.उपविभागीय अधिकारी आयुष नोपानी यांनी त्वरित वरोरा पोलीस स्टेशन येथे दाखल होत ट्रॅक्टर मालकाची माहिती घेतली. ट्रॅक्टर चालक व संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करत कारवाई करू असे आश्वासन दिले.

काल रात्री वनोजा वरोरा रोडवर झालेल्या अपघातात रियाज खा पठाण व एकाला सायंकाळी 6.30 च्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ,त्यावेळेस अपघातग्रस्त इस्माचे पोलीस स्टेशन वरोरा ला मेमो पाठविण्या संदर्भात कागदपत्रे तयार होते परंतु त्या वेळेस ड्युटी वर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे मेमो पोलीस स्टेशन वरोरा ला पोहचू शकला नाही.याबाबत चौकशी करून जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल
सदर मेमो आज दिनांक 18 जानेवारी 2023 ला सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन ला पाठविला आहे.

डॉ. अंकुश राठोड प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ,उपजिल्हा रुग्णालय ,वरोरा

वरोरा – माढेळी मार्गावर भरधाव कोळशाची जडवाहतुक सुरू राहत असल्याने छोटे मोठे अपघात होत असतात असे नागरिकांचे म्हणणे आहे.रात्रीला वरोरा तालुक्यात पोलिसांची पेट्रोलिंग चालू असताना देखील वनोजा येथे घडलेल्या घटनेकडे पोलिसांचे दुर्लक्ष का व्हावे हे गूढ अजूनही कळले नाही अशी चर्चा नागरिकांत सर्वत्र आहे. भरधाव जडवाहतुकीवर संबंधित प्रशासनाने निर्बंध लावावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
वृत्त लिहितोपर्यंत ट्रॅक्टर चालक मालकाला अटक किंवा कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.