
वरोरा शहरातील दूषित पाणी पुरवठा झाल्याने मालवीय वॉर्ड येथील 4 वर्षीय पूर्वेश वांढरे याचा अतीसारा ने मृत्यू झाला .त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत ब्लॅक लिस्ट करत कारवाई करावी यासाठी एम आय एम चे तालुकाध्यक्ष मुज्जमील शेख यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे मागणी केली आहे.
वेळेत कारवाई न झाल्यास नगर परिषदेवर ताळे बंद आंदोलन करू
एम आय एम तालुकाध्यक्ष मुजजमिल शेख यांनी वेळोवेळी दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या परंतु याकडे जाणीपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचे मुज्जमिळ शेख यांनी प्रतिनिधी ना सांगितले.
