

शिरपूर नेरी मार्गावरील पूर्वी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या काही अंतरावर नवीन पुलाचे बांधकामासाठी खोदलेल्या पुलाच्या बांधकाम झालेल्या अर्धवट खड्यात एक दुचाकीस्वार दुचाकीसहित पडला त्यामुळे डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार सुनील सुधाकर सिडाम वय 34 वर्षे रा. जामनी येथील रहिवासी असून दि 25 ऑक्टोबर ला हा शिरपूर येथे साळ्याच्या अंत्यविधीसाठी आला होता. साळ्याचा अंत्यविधी करून सायंकाळी जेवण करून जामनी साठी निघाला जाताना नातेवाईकांनी उशीर झाला आहे त्यामुळे एवढ्या रात्री एकटा जाऊ नको असा आग्रह केला त्यांना न जुमानता एकटाच गावाकडे निघाला असता नेरीजवळील नवीन पुलाच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तोल जाऊन दुचाकी घसरली आणि तो सुद्धा डबक्यात पडला असता डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच जीव गेला असावा प्राथमिक अंदाज नागरिक वर्तवित आहे.तर तरुण हा पाण्यात पडून मरण पावला असा अंदाज आहे सदर घटनेची माहिती रात्री 9 वाजता एका चारचाकी वाहनाने शिरपूर येथे जात असलेल्या चालकाला गाडी खड्यात दिसताच पडून असल्याने लक्षात आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील कारवाही साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले .
या घटनेला रस्त्याचे बांधकाम करणारी एस आर के कंपनी जवाबदार असून मागील एक वर्षांपासून संथगतीने काम करीत असल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत .पुढील तपास चिमूर चे पोलीस करीत आहेत