अण्णाभाऊ साठे चौकात नंदीबैल पोळाचे भव्य आयोजन [ मोबाईल, स्टडी टेबल फॅन सायकल डिनर सेट स्कूल बॅग छत्री बॉक्स सह प्रत्येक सहभागीला बक्षीस] [बाळू धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने आयोजन ]

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील अण्णाभाऊ साठे, प्रभाग क्र 5 येथे या वर्षी तान्हापोळा चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.शशिकांत उर्फ बाळू धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले.मागील वर्षी देखील या ठिकाणचा नंदी पोळा आकर्षणाचे केंद्र ठरला होता. तहसीलदार अमित भोईटे , ठाणेदार सीताराम मेहत्रे यांचे सह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. या वेळी मोबाईल, फॅन, स्टडी टेबल, छत्री या सह शेकडो उपयुक्त वस्तू विविध बक्षीसे वाटप करण्यात येईल. सहभागी प्रत्येकाला हमखास बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अनेक कल्पक नंदी सजावट करून चिमुकल्यानी उपस्थित्यांच्या राहावे. या वेळी उत्कृष्ट नंदी सह सर्व सहभागी चिमुकल्यांना बक्षीसांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात होईल .
मातीचा नंदी,उत्कृष्ठ नंदी, उत्कृष्ट बासिंग, उत्कृष्ठ सजावट, वेशभूषा, नावीन्यपूर्ण या विविध प्रकारात प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवे व सहावे बक्षीस देण्यात आले. निवड समिती द्वारे या प्रकारतील स्पर्धेकांची एकमताने समिती द्वारे निवड करण्यात येईल . स्टडी टेबल 10 पाच मोबाइल, टेबल फॅन,पाच चेअर,10 छत्री, या सह प्रत्येक सहभागी नंदी सजावटी साठी ला विविध खेळणी बक्षीस देण्यात येईल.
प्रभागातील व राळेगाव शहरातील चिमुकल्यानी,नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. व आनंदाच्या पर्वनित सम्मीलीत व्हावे असे आवाहन आयोजक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी केले आहे .