

तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दिनांक १ ऑक्टोबर रोजी कळंब नगर पंचायत मार्फत
स्वच्छता हि सेवा अंतर्गत स्वच्छता श्रमदान, स्वच्छता शपथ आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन तसेच कळंब शहरातील बस स्थानक परिसर व शहीद स्मारक परिसरात साफसफाई करण्यात आली.
स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता हि सेवा २०२३ चा एक भाग म्हणून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशभरात १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. नागरिकांच्या नेतृत्वाखाली एक मोठी स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली होती. २ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान आणि इतर मान्यवर देखील जमिनीवर स्वच्छ्ता उपक्रमात सामील होणार आहेत. त्याअनुषंगाने कळंब नगर पंचायत मार्फत आज सकाळी दहा वाजता कळंब नगर पंचायतचे मुख्याधिकारी मा. श्री. अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ०७ येथील स्मशानभूमीत स्वच्छता करण्यात आली. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याचवेळी शहरातील बस स्थानक परिसर व शहीद स्मारक परिसरात साफसफाई करण्यात आली.
कळंब शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.प्रत्येक नागरिकाने एक तरी वृक्ष लावुन जोपासला पाहिजे तरच पर्यावरण टिकेल असे आवाहन स्वच्छता दुत प्रशांत डेहनकर यांनी केले. यावेळी राजाभाऊ वेट्टे नायब तहसीलदार, अतुल देशपांडे नायब तहसीलदार, दीपमाला भेंडे पोलिस निरीक्षक, सागर बारस्कर सहायक पोलिस निरीक्षक, सुभाष चौधरी सहायक पोलिस निरीक्षक कळंब सर्व मा.न.प. नगरसेवक आकाश कुटेमाटे (उपनगराध्यक्ष), चंद्रशेखर चांदोरे योगेश धांदे, मारोती वानखेडे सौ.संगिता राजेंद्र चामाटे, राजेंद्र भोयर सामाजिक कार्यकर्ते प्रविन निमकर मारोती सुरदुसे, कळंब नगर पंचायतचे सर्व अधिकारी- कर्मचारी तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते. सदर स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी नगर पंचायत प्रशासकीय अधिकारी सुनील मगर, नारायण रोहणे, अविन वेल्के, गिरीश गिरटकर जयदेव केवटे, अमित मोहनापुरे,आदित्य कळमकर प्रदिप मोहोळ,रंजीत हिवरे, कळंब पोलिस स्टेशन हे. कॉ. राजु इरपाते, राजु कुडमथे, संजय वाघाडे, पो. कॉ. मंगेश डबाले, होमगार्ड परमेश्वर खाके, श्रावण भोयर, कुणाल माहुरे, संदिप महाजन, श्रीकांत चांदोरे तसेच नगर पंचायतच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
