पांडुरंगाचे नामरुपी अलंकार घडविणारे संतश्रेष्ठ नरहरी महाराज


………………………………….

शिव आणि वैष्णव यांच्यातील भेदाभेद मिटवण्यासाठी संत श्री नरहरी महाराजांचा जन्म झाला असे सांगितल्या जाते नेमका काय होता शिव, वैष्णवांचा भेद जेव्हा भारतात राजकीय अस्थिरता होती तेव्हा धार्मिक रित्या वेगळी चळवळ होती शिवाचे भक्त आणि विष्णूचे भक्त सतत यांच्यामध्ये वैचारिक मतभेद व्हायचे अटीतटीचे वैचारिक मतभेद व्हायची शिव आणि वैष्णवांचे सगळे काही वेगळे वेगळे होते शिव भक्त हे आडवे गंध लावायचे तर वैष्णव उभे गंध लावत असत प्रत्येक गोष्ट विरोधाभाशी पद्धतीने असायची हा एक संघर्ष होता. त्यामुळे बरच धार्मिक,सामाजिक नुकसान झालं पण ज्यावेळी परकीय आक्रमणे सुरू झाली तेव्हा अनेकांना असे लक्षात आले की एकच संघ होणे जरुरी असून यामध्ये अनेक धुरिणांनी संतांनी प्रयत्न केले त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज होते शैव असूनही वैष्णवाची भक्ती केली नाथ असूनही विठ्ठलाची भक्ती केली तात्विक दृष्ट्या हे कसे समतुल्य,सारखे आहे हे मांडून दाखवले आणि प्रात्यक्षिकातून नामदेव महाराज यांनी अनेकांना आपल्या सोबत घेऊन अस्तित्वात आणून दाखवलं माऊली ज्ञानेश्वराचं तत्त्व व संत नामदेवांचे प्रात्यक्षिक
यांच्या एकीला सुरुवात झाली व संत नरहरी सोनार हे त्यांचे प्रतिनिधित्व, शिव आणि वैष्णव या दोघांमधील यांची परिनीती संत तुकारामांमध्ये झालेली आढळते इथे तुकोबांनी एका बाबीला अनुसरून एक अभंग अत्यंत सुंदर गोवला आहे शिव आणि विष्णू हे कसे एक आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा संतश्रेष्ठ तुकोबांनी केला असावा.

दोघे सारिखे! सारिखे!!१!!
विष्णूनाथ! विठ्ठल सखे!!२!!
एक शोभे! भस्मउटी!!३!!
एका कस्तुरी! लल्लाटी!!४!!
एका शोभे !वाग्र्याबर!!५!!
एका काशी! पितांबर!!६!!
एका शोभे! रुंडमाळा!!७!!
एका वैजयंती! गळा!!८!!
एका अर्धांगी! पार्वती!!९!!
एका लक्ष्मीचा! पती!!१०!!
एक नंदीचे !वाहन!!११!!
एक गरुडी स्कंदिजान!!१२!!
तुका म्हणे हरीहरा! एका वेलांटीचा फेरा!!१३!!
पण लोक विनाकारण याबाबत भेद उपस्थित करत होते. केवळ एका वेलांटीसाठी एवढावाद नकोच असे तुकोबांनी सुद्धा सांगितले आहे. हा वाद नकोच याची सुरुवात श्री संत नरहरी महाराज यांनी केलेली बघायला मिळते श्री संत नरहरी हे मूळचे पंढरपूरचे त्यांचे खूप जुने पूर्वज पंढरपूर मध्ये येऊन स्थायिक झाले त्यांच्याच पूर्वजांनी तीर्थक्षेत्र पंढरपूर बसवले असं सुद्धा सांगितलं जाते तसं बघता जन्म निश्चिती नक्की नाही एकूण ९२ वर्षाचे आयुष्य लाभलं असा समज आहे. जन्म तिथि निश्चित नाही संतांच्या तारखांमध्ये नेहमीच मतभेद आहेत पण आपण यापासून दूर राहून त्यांच्या सत्कर्माचा विचार करायचा असल्यामुळे तारखेच्या वादात न पडलेलं बरं त्यांचे संपूर्ण नाव नरहरी अच्युतराव उदावंत असे सांगितले जाते . नरातील हर म्हणजेच शिव नरातला हरी म्हणजेच वैष्णव आणि नरहरी असे दोन्ही उच्चार केले जातात शिव, वैष्णव यांच्यातील भेद मिटावा यासाठीच बहुदा त्यांचा जन्म झाला असावा त्यांच्या गुरुचे नाव गैबीनीनाथ तर प्रेरणास्थान संत नामदेव होते. त्यांच्या पूर्वजांनी काही लोकांच्या मदतीने पंढरपूर मधील दरोडेखोरांचा बंदोबस्त केला म्हणून शालिवाहनांनी त्यांना पंढरपूर दान केलं होतं त्यानंतर पंढरपूर वसवलं अशी माहिती कळते व ज्या लोकांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त केला त्या शिव मंदिराला तिथला अधिकार तत्कालीन काळात दिला असावा मालूकवी नावाचे संत नरहरींच्या १० व्या वंशजाने एक “मालूतारन” नावाचा ग्रंथ अधोरेखित केलेला आहे. त्या ग्रंथामध्ये ही सर्व माहिती सांगितलेली आहे. ते त्यांचे १० वे वंशज असून मालूतारण नावाचा ग्रंथ १८४२ मध्ये लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये नरहरी महाराजांच्या ५८ आधीच्या पिढीची माहिती आहे. संत नरहरी महाराजांनी विकोपाला गेलेला वाद संपूर्ण परिसराला अत्यंत मोठा असा हरिहरातील वाद मिटवला विठ्ठलाची करदोडयाची प्रसिद्ध कथा सर्वश्रुत आहे नरहरी महाराज कट्टर शिवभक्त होते शिवा, शिवाय दुसऱ्या देवाला भजायचे सुद्धा नाही असा त्यांनी अट्टहास केला होता पण एके दिवशी पंढरपूर मधील विठ्ठलाला कमरेचा एका व्यापाऱ्याने करदोडा करण्यासाठी टाकला खरा त्यांनी सांगितले की श्री विठ्ठलाला करदोडा करणार नाही पण समोरच्या व्यक्तीने नम्रतेने विनंती केल्यानंतर नरहरी महाराज विठ्ठलाला करदोडा करून देण्यास तयार झाले. व त्यांनी त्या व्यक्तीला करदोड्याचे माप आणायला सांगितले प्रत्येक वेळी मापामध्ये तफावत येत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी नरहरी महाराजांना विनंती केली आपण प्रत्यक्ष येऊन माप घ्यावे पण नरहरी महाराज यांनी त्या व्यापाऱ्याला सांगितले की माझा एक अट्टहास आहे तेव्हा त्या व्यापाऱ्याची आणि महाराजांची तडजोड झाली व महाराजांच्या डोळ्यावर पट्टी बांधली व विठ्ठलाच्या मूर्तीच्या कमरेचा करदोड्यासाठी माप संत नरहरी घेत असताना चाचपणी करत होते तर त्यांना प्रत्येक ठिकाणी महादेवाची पिंड लागत होती. आणि डोळ्यावरची पट्टी काढली की पांडुरंगाची मूर्ती दिसायची आणि डोळ्यावर पट्टी ठेवली की पिंडीचा स्पर्श व्हायचा असे अनेक वेळा झाल्यामुळे त्यांना साक्षात्कार झाला की शिव आणि वैष्णव एकच आहे आणि मग त्यांनी वारकरी सामप्रदायाचा स्वीकार केला ही करदोड्याची घटना प्रसिद्ध आहे. हा भेदाभेद शमला वारकरी संप्रदायामध्ये नरहरी महाराज लिन झाल्यानंतर त्यावेळेस ते म्हणतात
विटे गे तुझी! काय वर्णू!१!
धिटाई करून उभी ठेवली तू
विठाई!!२!!
कधी योग अष्टांग पावेन!!
भंगा नमस्कार हा! रुक्मिणी पांडुरंगा!!४!!
त्यांनी सांगितले असावे की बाई तू खूप धीट्ट आहे की साक्षात पांडुरंगाला इतके दिवस विटेवर उभे केलेस.
अशा तऱ्हेने शिव आणि वैष्णव हे एकच आहे याला शिरोधार्य मानून
नरहरी महाराज पांडुरंगाला स्मरण करून म्हणत असतील
अहोरात्र मी ध्यात असे सांब भोळा!१!
न पाहे तुझा देवा केव्हाही डोळा! २!! कटीसूत्र ही झाले तुस्त अंगा नमस्कार हा रुक्मिणी पांडुरंगा!!३!!
जयंती निमित्ताने संत शिरोमणी नरहरी महाराजांना आदरपूर्वक अभिवादन
निरुपन
प्रवीण रमेश जोशी
मु पो ढाणकी
ता उमरखेड जिल्हा यवतमाळ