
प्रतिनिधी//शेख रमजान
सात महिन्या पूर्वी ढाणकी जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षक याने शाळेतील सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केला होता . याप्रकरणी बिटगाव पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . ही घटना गांभीर्याने घेत यवतमाळच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पंचाकडे चौकशी केली असता सदर शिक्षकाने चार मुलींचा विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते . त्यानंतर पालकांनी या शिक्षकावर कठोर कारवाई करून त्याला निलंबित करण्याचा आदेश देण्याची मागणी केली होती . या प्रकरणातील आरोपी शिक्षक फरार होता .आरोपीचा शोध चालू असताना पोलीस स्टेशन बिटरगाव अप. न. 244/25 कलम 75(1) भारतीय न्याय सहीता सहकलम 8,12 पोकसो मधील फरार आरोपी शेख जमीर शेख नजीर रा. उमरखेड हा मागील सात महिन्या पासून फरार असलेला आरोपी . 18 जून 2025 रोजी पुसद कोर्ट येथे हजर होण्या करिता आल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास बिटरगाव पोलीसानी पुसद कोर्ट येथून ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्हामध्ये अटक केली आहे.
सदर ची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, पीयूष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ,हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांच्या मागदर्शनात ठाणेदार पांडुरंग शिंदे पोहेका रवी गिते, प्रवीण जाधव यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमावर हे करित आहेत
