
सहसंपादक -रामभाऊ भोयर
वडकी परिसरातील व तालुक्यातील शेतकरी आधीच यंदा झालेल्याअतिवृष्टीतून सावरला नसताना खरीप व रब्बी पिकाने बसलेल्या फटक्यातून सावरला नसताना आता शेवटची आशा म्हणून घेतलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर आशा ठेवली असताना हे उन्हाळी पीकही नाफिकीच्या उंबरठ्यावर दिसत असल्यामुळे शेतकरी पूर्णतः ढासळला असून संकटात सापडला आहे.
खरीप व रब्बी हंगामातील सर्वच पिकांचानायनाट झाला.प्रमाणापेक्षा जास्त पडलेल्या पावसाने खरिपातील कापूस, सोयाबीन, कडधान्यासह कपाशीतील मिश्र पिकांची नासाडी झाली. पण तरी बळीराजाने हार न मानता नव्याने उन्हाळी सोयाबीन या पिकासाठी आपले कंबरडे कसून , पिकांच्या पेरणीची तयारी
केली, परंतु हे उन्हाळी सोयाबीन पीक चांगले आले असताना मध्यंतरी आलेले ढगाळ वातावरण मुळे पुन्हा शेतकर्यांची चिंता वाढली आहे.ढगाळवातावरणामुळे ह्या उन्हाळी सोयाबीन पिकावर व्हायरसचा प्रभाव पडून विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांचा नियंत्रणासाठी फवारणी करण्याचा आर्थिक भूर्दंड शेतकर्यांना सोसावा लागत आहे. तसेच ह्या सोयाबीन पिकाची झाडे चांगली वाढ झाली परंतु या झाडांना शेंगा खूप कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा सुद्धा खर्च निघतो की नाही अशी चिन्हे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे पाहून हवालदील झाला आहे. दोन्ही हंगामातील पिकांनी दगा फटका दिल्याने आता आशा असलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर ही व्हायरस व आळीचे आक्रमण व त्यात सोयाबीन झाडाला नसलेल्या शेंगा पाहता सर्व शेतकरी वर्ग पुन्हा संकटात सापडला आहे. आता तोंडाशी आलेला घास हीरवणार की काय असे शेतकऱ्यांना वाटून राहिले आहे
सततचा निसर्गाचा लहरीपणा , अस्मानी व सुलतानी संकट शेतकर्यांच्या जीवावर उठलाआहे. दोन्ही हंगामातील पिकांना बसलेला फटकातून सावरण्यासाठी घेतलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाला नसलेल्या शेंगा व व्हायरसचा अटॅक यामुळे आजच्या घडीला उन्हाळी सोयाबीन हे एकरी एक ते दोन क्विंटल एव्हरेज देते की नाही असे झाले असल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णता हादरला आहे. उन्हाळी सोयाबीन होणार की नाही या विवंचनेने शेतकरी वर्ग ग्रासला असून आता पुढे काय करावे या विवंचनेत शेतकरी बांधव विचार करताना दिसत आहे.
