भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेत अमाप गर्दी, कांग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याचा केला संकल्प

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राळेगाव तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा दिनांक 18/10/2024 रोजी वसंत जिनिंगच्या भाऊसाहेब कोल्हे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात सर्व प्रथम मंचावर विराजमान मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष पक्षाचे अध्यक्ष अँडव्होकेट प्रफुल्लभाऊ, पक्षाचे नेते प्राध्यापक वसंत पुरके सर ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा अध्यक्ष इंजिनीअर अरविंदभाऊ वाढोणकर कांग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपसभापती भरत पाल, वसंत जिनिंग राळेगावचे उपाध्यक्ष अंकुश रोहणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक देशमुख , प्रविण कोकाटे, फुटाणे सर, वसंत शेटे, बाळासाहेब जवादे, अँडव्होकेट किशोर मांडवकर, महादेवराव मेश्राम, अशोकराव केवटे, सदाशिव मडावी, आशिष कोल्हे,राजेश शर्मा यांचे शब्दसुमनांनी स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनियर अरविंद वाढोणकर यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात केली.ते बोलताना म्हणाले की आपणास येणाऱ्या निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचे आहे.त्याच सोबत कार्यक्रमाला जमलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण सर्वांनी ही निवडणूक आपली म्हणून लढायची आहे असे आवाहन केले.त्यांतर पक्षाचे नेते तथा माजी शिक्षणमंत्री यांनी आपण सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सक्रिय आणि एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत.ही निवडणूक आपल्या कुणाची वयक्तिक नाही तर ही आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायची आहे.पक्षांनी दिलेला कोणताही उमेदवार असेल त्यांच्यासाठी आपण सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मन लावून काम करून परत एकदा पक्षाचा उमेदवार विधानसभेत निवडून पाठवायचा आहे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अँडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी बोलताना सांगितले की ही लढाई आपल्या लोकांवर शासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उठविलेला आवाज असून आपणास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दिलेला उमेदवार लोकसभेत मिळालेल्या मतापेक्षाही जास्त मतांनी निवडून आणायचा असून राळेगाव तालुक्यातून आपण सर्वांच्या ताकदीने दुप्पट लीड देऊन विधानसभेत निवडून पाठवायचा आहे.आपले उमेदवार हे निवडून तर येणारच आहे पण खूप जास्त मतांनी निवडून आणायचे आहे असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष प्रदीप ठुणे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी केले.या कार्यक्रमाला स्वयंस्फूर्तीने तालुक्यातील वेगवेगळ्या वयोगटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शविली होती.सोबतच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, नगरपंचायतीचे पदाधिकारी, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी वसंत जिनिंग राळेगावचे पदाधिकारी, खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी व महिला अध्यक्ष कोपरकर मॅडम, अँडव्होकेट सिमा तेलंगे,व नगरसेवक, नगरसेविका राळेगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष धवल घुंगरूड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते